पुरुषांच्या क्रिकेट सामन्यात पंच म्हणून काम पाहणार महिला


दुबई – क्रिकेटविश्वात इतिहास घडवण्यास वेस्ट इंडिजच्या महिला क्रिकेट पंच जॅकलिन विल्यम्स सज्ज झाल्या असून जॅकलिन या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात पहिल्या महिला थर्ड अंपायर (तिसरे पंच) म्हणून काम पाहणार आहेत.

जॅकलिन विंडीज आणि आयर्लंडमध्ये रंगणाऱ्या पहिल्या टी-२० सामन्यात तिसऱ्या पंचांची भूमिका पार पाडतील. तीन टी-२० सामन्याची मालिका या संघांमध्ये खेळवण्यात येणार असून आज बुधवारपासून या मालिकेची सुरूवात होणार आहे.

माझ्यासाठी हा मोठा सन्मान आहे आणि मी देखील पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात टीव्ही पंचांची भूमिका साकारण्यास पूर्णपणे तयार आहे. मी पुरुषांच्या स्थानिक सामन्यातही पंच म्हणून काम केले आहे. पण आता पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात मी प्रथमच पंच म्हणून काम करेन. बऱ्याच वर्षांपासून सहकार्य केल्याबद्दल मी आयसीसीची आभारी आहे. आगामी काळात अधिक महिला पंच पुढे आल्या पाहिजेत, असे जॅकलिन यांनी निवड झाल्यानंतर म्हटले आहे.

Leave a Comment