जगातील आठ श्रेष्ठ पर्यटनस्थळांमध्ये ‘स्टॅच्यु ऑफ युनिटी’चा समावेश


नर्मदा : जगातील आठ श्रेष्ठ पर्यटनस्थळांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला आणि नर्मदेच्या किनाऱ्यावर उभारण्यात आलेला ‘स्टॅच्यु ऑफ युनिटी’ पुतळ्याचा समावेश करण्यात आला आहे. ‘स्टॅच्यु ऑफ युनिटी’चा जगातील आठ आश्चर्यांपैंकी एक आठ देशांची आंतरराष्ट्रीय संघटना असलेल्या शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायजेशनने (SCO) घोषीत केल्याची ही माहिती परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ट्विट करून दिली आहे. भारत, पाकिस्तान, चीन, कझाकिस्तान, किर्गिस्तान, तझाकिस्तान, रशिया आणि उझबेकिस्तान या देशांचा शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायजेशनच्या सदस्यांमध्ये समावेश आहेत.


SCO च्या आठ आश्चर्यात गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यातील केवडिया स्थित स्टॅच्यु ऑफ युनिटीला स्थान मिळणे ही देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे. याचा जगातील आठ श्रेष्ठ पर्यटनस्थळांमध्ये समावेश झाल्याने येथे पर्यटनालाही वाव मिळेल. तसेच केवडियाच्या स्थानिकांनाही रोजगाराच्या अनेक संधी उत्पन्न होतील. SCO चे सदस्य देशही स्टॅच्यु ऑफ युनिटीचा प्रचार करतील.

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी आपल्या ट्विटमध्ये मला हे सांगताना खूप आनंद होत की, अद्वितीय प्रतिमा असलेल्या ‘स्टॅच्यु ऑफ युनिटी’ला SCO च्या आठ आश्चर्यात सामिल करण्यात आले आहे. या सन्मानामुळे नक्कीच पर्यटक तिकडे अधिक आकर्षित होतील, असे म्हटले आहे. शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायजेशन एक आंतरराष्ट्रीय संघटना असून ज्यामध्ये रशिया, चीनसहीत आठ सदस्य देशांचा समावेश आहे. आपल्या क्षेत्रात परस्पर विश्वास आणि संबंध मजबूत करणे तसेच शांती-सुरक्षा आणि स्थिरतेला प्रोत्साहन देणे हे आपले लक्ष्य असल्याचेही एस. जयशंकर यांनी म्हटले आहे.

Leave a Comment