जिथे संपला पहिला भाग तेथून पुढे सुरु होईल ‘गो गोवा गॉन’चा सिक्वेल


तब्बल आठ वर्षानंतर म्हणजे मार्च 2021 मध्ये ‘गो गोवा गॉन’ या चित्रपटाचा सिक्वेल रिलीज होणार. ही माहिती मॅडॉक फिल्म्सने ट्विटरद्वारे दिली. आपल्या ट्विटमध्ये कंपनीने लिहिले की, जॉम कॉम चित्रपटाच्या सिक्वेलसाठी सज्ज असावा.


यासंदर्भात वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, मॅडॉक फिल्म्सचे संस्थापक दिनेश विजान यांनी सांगितले की, 2013 पासून हे एका प्रवास सारखे आहे आणि या वेड्या प्रवासासह आम्ही परत आलो आहोत. बर्‍याच गोष्टींची गो गोवा गॉनने व्याख्या केली आणि आम्ही पुन्हा एकदा असे करण्यास तयार आहोत. या कालावधीत, आमच्याबरोबर असलेली सर्व पात्रे आम्ही परत आणत आहोत. ते पुढे म्हणाले की, सध्या फायनल ड्राफ्टवर काम सुरु असून सप्टेंबर 2020 पासून चित्रीकरणाला सुरूवात होईल.


इरॉस इंटरनॅशनल मीडिया लिमिटेडचे​सुनील लुल्ला म्हणाले की, ‘गो गोवा गोन हा एक खास चित्रपट आहे, ज्याचे स्मरण केले जाते. कल्टचा दर्जा या चित्रपटाला मिळाला असल्यामुळे एक उत्तम फ्रेंचाइज बनवेल. 2013 मध्ये आलेल्या गो गोवा गॉनच्या पहिल्या भागात सैफ अली खान, कुणाल खेमू, वीर दास, पूजा गुप्ता आणि आनंद तिवारी मुख्य भूमिकेत होते.

Leave a Comment