सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली निर्भयाच्या दोषींची पुनर्विचार याचिका


नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार व हत्याप्रकरणातील आरोपी विनय कुमार शर्मा आणि मुकेश सिंह या दोन्ही आरोपींची फाशी रद्द करण्याची पुनर्विचार याचिका फेटाळली आहे. दरम्यान दिल्लीच्या पतियाळा कोर्टाकडून निर्भया सामूहिक बलात्कार व हत्याप्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा ठोठावली आहे. 22 जानेवारी 2020 दिवशी सकाळी 7 वाजता तिहार जेलमध्ये त्यांना फाशी दिली जाणार आहे.

दरम्यान फाशीच्या शिक्षेऐवजी आजीवन तुरूंगवासाची शिक्षा इतर खटल्यांप्रमाणे निर्भया सामूहिक बलात्कार व हत्याप्रकरणातील आरोपींना देखील द्यावी अशी अशी मागणी त्यांच्या वकिलांकडून सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली होती, पण सर्वोच्च न्यायालयाने पुर्विचार याचिका देखील फेटाळली आहे. याकरिता जस्टिस एन वी रामन्ना यांच्या अध्यक्षतेखाली 5 न्यायमूर्तींचे खंडपीठ होते. इन चेंबर करण्यात आलेल्या सुनावणीमध्ये फाशी टाळण्याचा शेवटचा पर्याय देखील संपला आहे.

Leave a Comment