हॉनर कंपनीने नविन वर्षात भारतात चार नवीन प्रोडक्ट्स लाँच केले आहेत. यामध्ये हॉनर 9एक्स, हॉनर बँड 5आय, हॉनर स्पोर्ट्स एअरफोन आणि हॉनर मॅजिक वॉच 2 यांचा समावेश आहे. कंपनीच्या स्मार्टवॉच हॉनर मॅजिक वॉच 2 ची 18 जानेवारीला अॅमेझॉन प्राइम मेंबर्स आणि 19 जानेवारीपासून सर्वांसाठी विक्री सुरू होणार आहे.
हॉनर मॅजिक वॉच 2 च्या 42 एमएम मॉडेलची किंमत 11,999 रुपये आणि 46 एमएम मॉडेलची किंमत 12,999 रुपये आहे. स्मार्टवॉच खरेदी करणाऱ्याला यावर हॉनर एएम61 ब्लूटूथ मोफत मिळेल. ही ऑफर केवळ 22 जानेवारीपर्यंतच आहे.

स्मार्टवॉचची बॉडी स्टेनलेस स्टीलची आहे. 42 एमएम मॉडेलमध्ये 1.2 इंच एमोलेड डिस्प्ले आणि 46एमएम मॉडेलमध्ये 1.39 इंच डिस्प्ले देण्यात आला आहे.

42 एमएम व्हेरिएंट स्मार्टवॉचमध्ये 7 दिवस बॅटरी बॅकअप मिळेल. तर 46 एमएम व्हेरिएंटमध्ये 14 दिवस बॅटरी बॅकअप देण्यात आलेला आहे. हॉनर मॅजिक वॉचमध्ये 8 आउटडोर मोड्स, 7 स्पोर्ट्स मोडसोबत 24 तास हार्ट रेट मॉनिटेरिंग फीचर मिळेल. यासोबतच वॉचला वॉटर आणि डस्टप्रुफसाठी 5एटीएम रेटिंग मिळाली आहे.