राजघराणे सोडल्यानंतर या कंपनीने दिली प्रिन्स हॅरीला नोकरीची ऑफर

प्रिन्स हॅरी आणि त्यांची पत्नी मेगन मार्केलने ब्रिटिश राज घराण्यातील वरिष्ठ सदस्य त्यागून आत्मनिर्भर होण्याचा निर्णय घेतला होता. या निमित्ताने फास्ट फूड कंपनी बर्गर किंगने प्रिन्स हॅरीला ट्विट करत नोकरीची ऑफर दिली आहे. सध्या हे ट्विट चांगलेच चर्चेचा विषय ठरत आहे.

बर्ग किंगने ट्विट केले की, हॅरी, हे रॉयल कुटुंब पार्ट टाईम नोकरीची ऑफर देत आहे.

रॉयल कुटुंबाचा येथे अर्थ बर्गर किंग आहे. हे ट्विट व्हायरल होत असून, हजारो युजर्स यावर आपले मत मांडत आहेत. आतापर्यंत 6 हजारापेक्षा अधिक युजर्सनी हे ट्विट लाईक केले आहे.

याआधी बर्गर किंगच्या अर्जेंटिना शाखेने देखील ट्विट केले होते की, ड्युक जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल, तर विना क्राउन गमवता शोधू शकता. अन्य ट्विटमध्ये लिहिले होते की, जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर आमच्याकडे तुमच्यासाठी एक नवीन क्राउन आहे.

Leave a Comment