भविष्यात रस्त्यावर धावताना दिसणार या भन्नाट कार

काही दिवसांपुर्वीच अमेरिकेतील लॉस वेगास येथे कंझ्यूमर इलेक्ट्रॉनिक्स शो 2020 चे आयोजन करण्यात आले होते. या शोमध्ये अनेक कॉन्सेप्ट कार सादर करण्यात आल्या. यावेळी सोनी, मर्सिडिज, ह्युंडाई सारख्या कंपन्यांनी आपल्या कॉन्सेप्ट कार सादर केल्या. या कार्सविषयी जाणून घेऊया.

Image Credited – Amar ujala

मर्सिडिज बेंझ व्हिजन अवतार –

मर्सिडिजने सीईएस 2020 मध्ये AVTR नावाने इलेक्ट्रिक कार सादर केली. या कारच्या डिझाईनसाठी अवतार चित्रपटाचे डायरेक्टर जेम्स कॅमेरूनची मदत घेण्यात आली. कारमध्ये स्टेअरिंग नाही. एका कंट्रोलरद्वारे कारला कंट्रोल केले जाईल. याचे व्हिल अवतार चित्रपटातील ‘सीड्स ऑफ द ट्री ऑफ सोल्स’ वरून प्रेरित आहेत.

Image Credited – Amar ujala

ह्युंडाई एस-ए1 –

ह्युंडाईने एअर टॅक्सी कॉन्सेप्टला नासाच्या डिझाईनद्वारे प्रेरित होऊन बनवले आहे. ही एअरक्राफ्ट कॉन्सेप्ट टॅक्सी 1000-2000 फूट इंचीवर ताशी 290 किमी वेगाने 100 किमीपर्यंत उडू शकते.  हे 100 टक्के इलेक्ट्रिक एअरक्राफ्ट असेल.

Image Credited – Amar ujala

फिस्कर ओशन –

फिस्कर ओशनला पहिल्यांदाच सीईएस 2020 मध्ये सादर करण्यात आले. याची रेंज 482 किमी आहे. यामध्ये दोन एक्सले – माउंडेट मोटर्स देण्यात आली असून, केबिन रिसायकल्ड आणि इकोफ्रेंडली वस्तूंपासून बनविण्यात आलेले आहे. यात 80kWh बॅटरी पॅक मिळेल. रुफवर सोलर पॅनेल मिळेल. तसेच सर्वच्या सर्व 9 खिडक्या उघडता येतील. ही कार 2021 पर्यंत रस्त्यावर धावताना दिसेल. याची किंमत 21 लाखांपेक्षा कमी असेल.

Image Credited – Amar ujala

सोनी व्हिजन – एस –

सोनीने या शोमध्ये व्हिजन-एस ही कार सादर केली. या कारमध्ये आत व बाहेर 33 सेंसर्स आहेत. सोबतच मल्टीपल वाइडस्क्रीन डिस्प्ले, 360 डिग्री ओडिओ, कनेक्टिव्हिटी फीचरसोबत ब्लॅकबेरी आणि बॉश सारख्या कंपन्यांच्या फीचरचा समावेश आहे. यामध्ये ऑनबोर्ड इंटरटेन्मेंट सिस्टम फीचर असून, हे 360 डिग्रीमध्ये येणाऱ्या वस्तूंची ओळख करते.

Image Credited – Amar ujala

क्रिसलर एअरफ्लो व्हिजन –

क्रिसलरने 1930 मध्ये सादर केलेल्या क्रिसलर एअरप्लोचे कॉन्सेप्ट सादर केले. ही कार पॅसिफिका एमपीव्हीवर बेस्ड आहे. यामध्ये चार लोक बसू शकतात व यात इंस्ट्रूमेंट क्लस्टर, इंफोटेनमेंट सिस्टम, फ्रंट पॅसेंजर डिस्प्ले, एअर कॉन कंट्रोल्स आणि रिअर सीट एंटरटेनमेंट डिस्प्ले मिळेल.

Image Credited – Amar ujala

बायटन एम-बाइट –

बायटनने आपली इलेक्ट्रिक कार एम-बाइट यावेळी सादर केली. या कारमध्ये विंडशिल्डच्या खाली 48 इंच स्क्रीन देण्यात आलेली आहे. कंपनीचा दावा आहे की, आतापर्यंत या कारसाठी 60 हजार ऑर्डर्स आले आहेत. कारमध्ये 5जी कनेक्टिव्हिटी, डॅशबोर्ड कॅमेरा फीचर्स मिळतील.

Image Credited – Amar ujala

जीप 4एक्सई –

फिएट कंपनी यावर्षी प्लग इन हायब्रिडसोबत जीप 4एक्सई सादर करू शकते. ही एसयूव्ही 48 किमीपर्यंत हायब्रिट सेटअपवर चालू शकते. यातील 1.3 लिटर टर्बो फोर इंजिन 240 एचपी पॉवर देईल.

Image Credited – Amar ujala

ऑडी एआय-एमई –

ऑडीने या शोमध्ये लहान अर्बन ट्रॅव्हल कार सादर केली. ही एक सेल्फ ड्रायव्हिंग कार आहे. यामध्ये आय-ट्रॅकिंग इंफोटनेमेंट सिस्टम सारखे फीचर्स देण्यात आलेले आहेत.

Image Credited – Amar ujala

निसान अरिया –

निसान अरिया एक क्रॉसओव्हर कम हॅचबॅक आहे. जी एकदा चार्ज केल्यावर 482 किमी अंतर पार करू शकते. या कारमध्ये 12.3 इंच डिस्प्ले मॉनिटर, क्लायमेट कंट्रोल आणि निसान ड्रायव्हर असिस्टेंस सिस्टम प्रो पायलट 2.0 देखील असेल.

Image Credited – Amar ujala

बीएमडब्ल्यू कार सीट –

सीईएस 2020 शो मध्ये बीएमडब्ल्यूने ड्रायव्हिंग अधिक आरामदायी करण्यासाठी असे सीट सादर केले, जे लॉन्ज चेअर प्रमाणे आहेत. कंपनीने बीएमडब्ल्यू एक्स7 झिरोजीमध्ये लॉन्जर सीट लावले होते. जे 60 डिग्री मागील बाजूस झुकतात.

Image Credited – Amar ujala

बॉश वर्च्युअल विसॉर –

बॉशने यंदा खास एक्टिव वाइजर यूटिलाइजिंग एलसीडी, कॅमेरा आणि आर्टिफिशियल टेक्नोलॉजी असणारा कॅमेरा सादर केला आहे. सन वाइजरच्या जागी कंपनीने हनीकॉम्ब पॅटर्न एलसीडी लावला आहे. यातील कॅमेरा आणि एआय टेक्नोलॉजी गाडी चालवणाऱ्या व्यक्तीच्या डोळ्यांची आणि सुर्याच्या किरणांचा एंगल ओळखते. त्यानंतर यात लावलेले हनीकॉम्ब सुर्याच्या किरणांना थेट व्यक्तीच्या डोळ्यांवर पडण्यापासून रोखते.

Leave a Comment