अमृता फडणवीसांनी अशा दिल्या मकर संक्रांतीच्या शुभेच्छा


माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच त्यांच्या सौभाग्यवती पत्नी अमृता फडणवीस यांची देखील कायम चर्चा होत असते. आपल्या गाण्यासह त्यांच्या फॅशनचीही नेटकऱ्यांमध्ये चर्चा असते. मागील काही दिवसांपासून आपल्या ट्विटमुळे चर्चेत असणाऱ्या अमृता या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.


सोशल मीडियावर मकर संक्रांतीच्या अमृता फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. ‘तिळ गुळ घ्या गोड गोड बोला’, मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा-और ‘लोहरी दी लाख लाख वधाइयाँ’ ! अशा शुभेच्छा अमृता फडणवीस यांनी दिल्या आहेत. या शुभेच्छांसोबत त्यांनी पोस्ट केलेल्या स्वत: च्या गॅलमरस फोटोची नेटकऱ्यांमध्ये चर्चा आहे.

Leave a Comment