भारतात 7,100 कोटींची गुंतवणुक करणार अ‍ॅमेझॉन

अ‍ॅमेझॉन कंपनीचे सीईओ जेफ बेझॉस सध्या भारत दौऱ्यावर आहेत. कंपनी भारतातील लघू व मध्यम उद्योगांचे डिजिटायझेशन करण्यासाठी 1 बिलियन डॉलर्सची (जवळपास 7,100 कोटी रुपये) गुंतवणूक करणार असल्याची घोषणा जेफ बेझॉस यांनी केली आहे. ते नवी दिल्लीतील संभव परिषदेत बोलत होते. याशिवाय ते म्हणाले की अ‍ॅमेझॉन 2025 पर्यंत 10 बिलियन डॉलर्स पर्यंतच्या मेक इन इंडिया अंतर्गत निर्माण झालेल्या वस्तूंचे जगभरात निर्यात करेल.

अ‍ॅमेझॉनचे सीईओ जेफ बेझॉस यांनी  अमेरिका आणि भारताची युती 21व्या शतकात सर्वात महत्त्वाची ठरणार असून, हे शतक भारतीयांचे असेल असेही ते म्हणाले.

जेफ बेझॉस म्हणाले की, भारतातील गतिशीलता, येथील उर्जा आणि प्रगती व येथील लोकशाही… या देशाकडे काहीतरी खास आहे.

जेफ बेझॉस भारतात येण्याआधीच काही तास कॉम्पेटिशन कमिशन ऑफ इंडियाने अ‍ॅमेझॉन विरोधात चौकशीचे आदेश दिले आहेत. सोबतच अनेक लघू व्यापाऱ्यांनी जेफ बेझॉस यांना विरोध दर्शवला आहे. अ‍ॅमेझॉन सारख्या परदेशी कंपन्या वस्तूंवर मोठ्या प्रमाणात सूट देतात, त्यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान होत असल्याचा आरोप आहे. अ‍ॅमेझॉन भारताकडे एक मोठा बाजार म्हणून पाहत असून, कंपनी भारतात 5.5 बिलियन डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे.

बेझॉस आपल्या भारत दौऱ्यात अनेक सरकारी अधिकारी, उद्योगपती आणि सेलिब्रेटींना भेटण्याची शक्यता आहे.

Leave a Comment