सफरचंदाचा लाल रंग हरवणार?


जगातील तापमान वाढ आणि हवामान बदलाचे प्रतिकूल परिणाम अनेक गोष्टींवर होत असल्याचे दिसून येत आहे. हवामान बदलाचा धोका सफरचंदाचा लाल रंगालाही निर्माण झाला असून संशोधकांच्या मते सफरचंदाचा आकर्षक लाल रंग नाहीसा होण्याची शक्यता आहे. आजकाल बाजारात हिरव्या, पिवळ्या, गुलाबी, सप्तरंगी रंगाची विविध सफरचंद मिळतात मात्र खरी मागणी असते ती लालबुंद सफरचंदाना. या सफरचंदांचा स्वादही वेगळा आणि अनेकांच्या पसंतीला उतरलेला आहे.

आज जगभरातील बाजारात सफरचंदे पिकली जातात आणि विकली जातात. मात्र सफरचंदाचे मूळ आहे मध्य आशियातील देश कझाकिस्तान. या देशाच्या पहाडी भागात जंगलात सफरचंद झाडे उगवत आणि ही सफरचंदे लाल रंगाची होती. फार पूर्वी ते अस्वलांचे खाणे मानले जाई. आता जंगली सफरचंदे ९० टक्के लोप पावली आहेत कारण आता सफरचंदे शेतात पिकविली जातात. सफरचंदांच्या बागा असतात आणि त्यांचे व्यावसायिक उत्पादन घेतले जाते.


सफरचंदावर मोठ्या प्रमाणावर संशोधन झाले आहे, होत आहे आणि त्यातून सफरचंदाच्या विविध जाती निर्माण केल्या गेल्या आहेत. सफरचंदाला लाल रंग मिळतो तो त्यातील एका विशिष्ट एन्झाईम मुळे. हे एन्झाईम सफरचंदाच्या सालीत असते. जितके तापमान कमी तितका हा लाल रंग अधिक गहिरा होतो. मात्र आता जागतिक तापमानवाढ होत आहे आणि सफरचंदाच्या जीन्सवर बरेच प्रयोग करून त्यांच्या जीन्स मध्ये बदल केले जात असल्याने सफरचंदाचा लाल रंग हरवत चालला असल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Comment