या मंदिरात सूर्यदेव परिवारासह आहेत विराजमान


मकरसंक्रांतीला सूर्यपूजेचे विशेष महत्व आहे. भारतात अनेक ठिकाणी सूर्यमंदिरे आहेत आणि या सर्व ठिकाणी भाविक मकर संक्रांतीच्या निमित्ताने दर्शनासाठी गर्दी करतात. या मंदिरातील एक अनोखे आणि जगातील एकमेव सूर्य मंदिर मध्यप्रदेशात बैतुल पासून २० किमी अंतरावर आहे. खेडी सावलीगढ येथे हे मंदिर तापी नदीच्या काठी असून येथे सूर्यदेव त्यांच्या दोन पत्नी संध्या आणि छाया, दोन पुत्र शनी आणि यम, दोन मुली यमुना आणि तापी तसेच त्यांच्या रथाचा सारथी अरुण याच्यासह विराजमान आहेत. या मंदिरात मकर संक्रांतीला भाविकांची मोठी गर्दी होते

हे मंदिर आजकाल देशात भाई बहन मंदिर म्हणून प्रसिद्ध झाले आहे. मकर संक्रांती दिवशी सूर्यकृपा व्हावी आणि वरदान मिळावे म्हणून येथे भाविक येतात. तापी नदी काठी असलेले हे एकमेव सूर्यमंदिर आहे. धार्मिक पुराणात तापी हिला आदिगंगा असे नाव आहे. म्हणजे जेव्हा सृष्टी निर्माण केली गेली तेव्हापासून तापी पृथ्वीवर आहे. अन्य नद्या ऋषीमुनींनी केलेल्या तपाचरणामुळे पृथ्वीवर आल्या आहेत.

पुराणातील कथेनुसार शनीने त्याच्या या बहिणीला म्हणजे तापीला असे वरदान दिले होते की, जो तापी नदीत स्नान करेल आणि उपासना करेल त्याला शनीचा त्रास कमी होईल. त्यामुळे ज्यांना साडेसाती सुरु आहे असे लोक पाच शनिवार तापी नदीत स्नान करून सूर्यउपासना करतात आणि शानिपूजन करतात. त्यानंतर हनुमानाचे दर्शन घेण्याची प्रथा आहे.

Leave a Comment