डोनाल्ड ट्रम्प फेब्रुवारीत भारत दौऱ्यावर येणार?


अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प फेब्रुवारी २०२०च्या पहिल्या आठवड्यात भारत भेटीवर येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. मिडियाच्या माहितीनुसार अमेरिकेतील आगामी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीपूर्वी ट्रम्प यांची भारत भेटीवर येण्याची इच्छा आहे. अर्थात या बातमीची दोन्ही देशांकडून अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र ट्रम्प खरोखरच आले तर त्याची भारताला ही पहिली अधिकृत राजकीय भेट असेल.

परराष्ट्र मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रम्प यांच्या भारतभेटीची दोन्ही देशातील संबंधित अधिकाऱ्यांकडून रूपरेषा तयार करण्याचे काम सुरु झाले आहे. गेल्या २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात अगोदर ट्रम्प याना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रण दिले गेले होते मात्र त्यावेळी त्यांनी हे आमंत्रण स्वीकारले नव्हते. ट्रम्प यांच्या आगामी भारत भेटीत दोन्ही राष्ट्रप्रमुखात म्हणजे ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान मोदी यांच्यात अनेक महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा होऊ शकते. त्यात दीर्घकाळ प्रलंबित द्विपक्षीय व्यापार करार शिवाय नागरी हवाई समझोता यांचा समावेश असेल.

गेल्या सप्टेंबर मध्ये पंतप्रधान मोदी याचचा ह्युस्टन मध्ये हौडी मोदी हा भव्य कार्यक्रम झाला होता त्यावेळी ५० लाख प्रेक्षक उपस्थित होते. त्या कार्यक्रमात ट्रम्प सामील झाले होते. तेव्हाच मोदींनी ट्रम्प यांना सहपरिवार भारत भेटीचे निमंत्रण दिले होते. ट्रम्प कन्या इव्हंका यापूर्वीच भारत भेटीवर येऊन गेल्या आहेत.

Leave a Comment