का खाल्ली जाते मकर संक्रांतीला खिचडी

khichdi
आज देशभरात मकर संक्रांती साजरा केली जात आहे. मकर संक्रांतीला दक्षिण भारतात पोंगल म्हणून ओळखले जाते, गुजरात आणि राजस्थानमध्ये उत्तरायन असे म्हटले जाते, तसेच हरियाणा आणि पंजाबमध्ये मकर संक्रांतीला माघी म्हणतात. हा सण संपूर्ण भारतभर साजरा केला जातो.

मकर संक्रांतीला खास करुन खिचडी बनवली जाते. तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी दान करण्यालाही फार महत्त्व आहे.

खिचडी खाण्याचे महत्व…

अशी आख्यायिका आहे की, मानले जाते की, तांदूळ हे चंद्राचे प्रतीक आहे, काळी उडीदाची डाळ शनि आणि हिरव्या पालेभाज्या बुधाचे प्रतीक आहे. म्हटले जाते की, कुंडलीत ग्रहांची स्थिती मजबूत करण्यासाठी मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी खायला हवी. यादिवशी म्हणूनच तांदूळ,काळी उडीद,मीठ,हळद,मटर आणि भाज्या पासून खिचडी बनविली जाते.

पूजेची विधी
मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नद्या मध्ये अंघोळ किंवा घरात सकाळी लवकर उठून पूजा केली जाते.
या दिवशी सूर्याची पूजा केली जाते. याबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी पूर्वजांचे ध्यान केले जाते.

Leave a Comment