येथे सापडले 250 किलोचे बॉम्ब, नागरिकांनी सोडले शहर

द्वितीय विश्वयुद्ध होऊन जवळपास 75 वर्ष झाली आहेत. मात्र एवढ्या वर्षानंतर देखील जर्मनीच्या डॉर्टमुंड शहरात जमिनीखाली 4 मोठमोठे बॉम्ब सापडले आहेत. हे बॉम्ब सापडल्याने लोकांमध्ये भिती पसरली असून, लोक शहर सोडून जात आहेत.

या प्रत्येकी बॉम्बचे वजन 250 किलो आहे. बॉम्बची माहिती मिळताच सुरक्षा एजेंसीने तेथे पोहचत बॉम्ब निष्क्रिय केले.

डॉर्टमुंड शहरातील लोकांना हे बॉम्ब सापडल्याची माहिती मिळताच, ते प्राण वाचवण्यासाठी शहर सोडून जाऊ लागले. रस्त्यावर लोकांची तुफान गर्दी झाली व यामुळे अनेक रस्ते जॅम झाले.

द्वितीय विश्वयुद्धाला 75 वर्षानंतर वारंवार युद्धात न वापरलेले बॉम्ब सापडत आहेत. एकीकडे काही लोक जीवाच्या भितीने शहर सोडून जात आहेत, तर काहीजण हे बॉम्ब पाहण्यासाठी गर्दी देखील करत आहेत.

द्वितीय विश्वयुद्धानंतर जर्मनीत सर्वात मोठा बॉम्ब विस्फोट 2017 साली झाला होता. ज्याचा तब्बल 65 हजार लोकांवर परिणाम झाला होता. जर्मनीत ज्या ठिकाणी हे बॉम्ब सापडले आहेत, तेथून 500 मीटर अंतरातील लोकांना प्रशासनाने घर सोडण्यास सांगितले आहे.

Leave a Comment