स्टॅच्यू ऑफ यूनिटीचा ‘एससीओ’च्या 8 आश्चर्यामध्ये समावेश

यूरेशियाच्या आठ देशांचे आंतरराष्ट्रीय संघटन ‘शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन (एससीओ) म्हणजेच शांघाय सहकार्य संघटनेने ‘स्टॅच्यू ऑफ यूनिटा’चा एससीओच्या 8 आश्चर्यांमध्ये समावेश केला आहे. एससीओच्या 8 सदस्यांमध्ये भारत, पाकिस्तान, चीन, कझाकिस्तान, किर्गीस्तान, तजाकिस्तान, रशिया आणि उज्बेकिस्तानचा समावेश आहे.

एससीओचे महासचिव व्लादिमीर नोरोव यांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची भेट घेतली व एससीओच्या सदस्यांमध्ये सहकार्याबद्दल समिक्षा केली. भारताने एससीओच्या प्रमुखांच्या परिषदेची अध्यक्षपदाची जबाबदारी स्विकारली आहे.

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नोरोव यांच्या भेटीनंतर ट्विट केले की, एससीओच्या अन्य सदस्य देशांमध्ये पर्यटनाला प्रोत्साहन देण्याच्या प्रयत्नांचेे कौतूक करतो. एससीओच्या 8 आश्चर्यामध्ये स्टॅच्यू ऑफ यूनिटीचा समावेश होणे याला नक्कीच प्रेरणेच्या स्वरूपात पाहिले जाईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे 31 ऑक्टोंबर 2018 ला जगातील सर्वात उंच स्टॅच्यू स्टॅच्यू ऑफ यूनिटीचे उद्घाटन करण्यात आले होते. हे आता जगातील सर्वात महत्त्वाचे पर्यटन स्थळ झाले आहे.

Leave a Comment