दुबईत भारतीय महिलेची हरवली पर्स, पाकिस्तानी ड्रायव्हरने काय केले पहा

एका पाकिस्तानी ड्रायव्हरने भारतीय वंशाच्या महिलेसाठी असे काम केले आहे की, ज्यामुळे त्याने सर्वांचेच मन जिंकून घेतले. दुबईमध्ये भारतीय वंशाच्या रचेल रोजची (Raechel Rose) पर्स मोद्दसर खादिमच्या (Modassar Khadim) कॅबमध्येच राहिली. मात्र कॅब ड्रायव्हर खादिमने याबाबत पोलिसात तक्रार दाखल करत रोजला तिची पर्स परत केली.

रोजने 4 जानेवारीला खादिमची कॅब बूक केली होती. ती आपल्या एका मित्राच्या बर्थडे पार्टीसाठी दुबईला आली होती. रोज टॅक्सीतून जात असतानाच अचानक तिच्या एका मित्राने दुसरी टॅक्सी बूक केली. त्यामुळे घाई गडबडीत रोज दुसऱ्या टॅक्सीत बसली व पर्स तिथेच विसरली.

रोजच्या पर्समध्ये महत्त्वाची कागदपत्रे होती. तिचा यूकेचा रेसिडेंट पुरावा, दुबईचा आयडी, ड्रायव्हिंग लायसेन्स, विमा, क्रेडिट कार्ड्स आणि 1000 दिरहाम (जवळपास 20 हजार रुपये) त्यात होते.

खादिमने रोज उतरल्यानंतर 2 राइड केल्या. त्याने पाहिले की एक पर्स पडलेली आहे. खादिमने सांगितले की, त्याने पर्स उघडून आयडी कार्ड बघितले. त्यानंतर खादिमने पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी रोजशी संपर्क करत तिला पर्स परत केली. रोजच्या कुटुंबाने यासाठी खादिमचे आभार मानले.

Leave a Comment