गुजरातच्या एका राजाला पोलंड या देशामध्ये मोठा दर्जा मिळालेला आहे. या ठिकाणी त्यांचा सन्मान केला जातो. याशिवाय त्यांच्या नावावर अनेक रस्ते व योजनांची देखील नावे आहेत. तेथे वृत्तपत्रांमध्ये त्यांच्या नावावर अनेक लेख छापले जातात. पोलंडमधील काही लोकांसाठी ते देवापेक्षा कमी नाहीत.

गुजरातच्या या महाराजांचे नाव जाम साहब दिग्विजय सिंहजी रणजीतसिंह जी आहे. ते नवानगरचे महाराज होते. द्वितीय विश्वयुद्धाच्या काळात त्यांनी पोलंडच्या 600 पेक्षा अधिक लहान मुले आणि महिलांचे प्राण वाचवले होते. या लोकांसाठी घराचे दरवाजे उघडले. 9 वर्ष त्यांचा सांभाळ केला. त्यांच्या खाण्या पिण्याची, राहण्याची व्यवस्था केली.

हिटलरने पोलंडवर आक्रमण करताच दुसरे विश्वयुद्ध सुरू झाले. तेव्हा पोलंडच्या सैनिकांनी आपल्या 500 महिला आणि जवळपास 200 लहान मुलांना एका जहाजेत बसून सोडून दिले. जहाजाच्या प्रमुखाला सांगितले की, ज्या देशात यांना शरण मिळेल, तेथे घेऊन जावे.

अनेक देशांनी त्यांना शरण देण्यास नकार दिला. अखेर ते गुजरातच्या जामनगर येथील तटावर पोहचले. जामनगरचे तत्कालिन महाराज जाम साहब दिग्विजयसिंह यांनी त्या सर्वांना शरण दिले व त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची देखील व्यवस्था केली.

हे शरणार्थी जामनगरमध्ये 9 वर्ष राहिले. या शरणार्थींमधील एक मुलगा नंतर पोलंडचा पंतप्रधान देखील झाला. आजही दरवर्षी त्या शरणार्थींचे वंशज जामनगरला येतात.

पोलंडची राजधानी वारसॉ येथील अनेक रस्त्यांना महाराजांचे नाव आहे. त्यांच्या नावावर पोलंडच्या अनेक योजना चालतात. त्यांच्याविषयी वृत्तपत्रात लेख देखील छापले जातात.