हैदराबादच्या 5 वर्षीय मुलाने रचला विश्वविक्रम

प्रतिभेला वयाचे बंधन नसते असे म्हटले जाते. अशीच काहीशी कामगिरी हैदराबादच्या एका 5 वर्षीय मुलाने केली आहे. आश्मान तनेजा या 5 वर्षीय मुलाने तायक्वांडोमध्ये 1 तासापर्यंत क्लीन नी स्ट्राइक करत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे.

याआधी त्याने यूएसए वर्ल्ड ओपन तायक्वांडो स्पर्धेत रौप्य पदक मिळवले आहे. त्याच्या नावावर गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची देखील नोंद आहे. आश्मानने 1 तास न थांबता 1200 पेक्षा अधिक नी स्ट्राइक करत विक्रम केला आहे.

आश्मानचे वडील आशीष तनेजा म्हणाले की, माझ्या मुलाने जागतिक विक्रमासाठी खूप सराव केला. हा विक्रम रचणारा तो सर्वात छोटा मुलगा आहे. तो अजून एका विश्व विक्रमासाठी मेहनत घेत असून, लवकरच तो पुर्ण करेल.

आश्मानने आपल्या या यशाचे श्रेय बहिणीला दिले आहे. तो म्हणाला की, जेव्हा माझ्या बहिणीला 2 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मिळाले, तेव्हा मला देखील वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवायचे होते. तीच माझी प्रेरणा आहे.

Leave a Comment