वैज्ञानिकांनी बेडकाच्या पेशींपासून बनवला जिंवत रोबॉट

वैज्ञानिकांनी बेडकाच्या स्टेम सेलपासून (पेशी) जगातील पहिला लिव्हिंग (जिंवत) आणि सेल्फ हिलिंग (स्वः उपचार) रोबॉट तयार केला आहे. यासाठी आफ्रिकेत आढळणाऱ्या बेडकाच्या स्टेम सेलचा वापर करण्यात आला. हा आकाराने एक मिलीमीटर (0.004) पेक्षाही लहान आहे. त्यामुळे तो मानवाच्या शरीरात सहज फिरू शकतो.

हा रोबॉट मानवाच्या शरीरात सहज चालू व तरंगू शकतो. याशिवाय अनेक आठवडे जेवणाशिवाय जिंवत राहू शकतो व समुहात काम देखील करू शकतो. वर्मोंट यूनिवर्सिटीने सांगितले की, हे पुर्णपणे नवीन जिवनाचे रूप आहे. हा शोध वर्मोंट यूनिवर्सिटीने टफ्ट्स यूनिवर्सिटीसोबत मिळून लावला.

स्टेम सेल या एक खास प्रकारच्या पेशी असतात. ज्या विविध प्रकारच्या पेशी विकसित करण्यासाठी कार्य करतात. वैज्ञानिकांनी बेडकाच्या भ्रूणातून जिंवत स्टेम सेल काढले व त्यांना अंड्यांवर सोडले. त्यानंतर या पेशी पसरल्या गेल्या व सूपर कॉम्प्युटरद्वारे डिझाईन बॉडी फॉर्म्समध्ये बदलल्या. त्यानंतर पेशींनी आपोआप काम करण्यास सुरूवात केली.

त्वचेच्या पेशींनी संरचना निर्माण केली. तर ह्रदयाच्या मासपेशींच्या पेशींनी स्पंदनाने रोबॉटला पुढे जाण्याची परवानगी दिली. एक्सनोबॉट्समध्ये स्व-उपचार करण्याची देखील क्षमता असते. या रोबॉटला कोणतेही गिअर अथवा आर्म्स नाही. हा एखाद्या गुलाबी मासाच्या छोट्या तुकड्याप्रमाणे दिसतो.

वैज्ञानिकांनी रोबॉटचे तुकडे केल्यावर तो आपोआप ठीक झाला. एक्सनोबॉट्सचा वापर समुद्रात रेडिओएक्टिव वेस्ट, मायक्रोप्लास्टिक जमा करण्यासाठी करता येऊ शकतो. मानवी शरीरात औषधे घेऊन जाण्यास देखील याचा वापर करता येईल. हे रोबॉट जलचर वातावरणात अतिरिक्त पोषक तत्वांशिवाय अनेक आठवडे जिवित राहू शकतात.

Leave a Comment