देशातील ऑनलाईन कंपन्या आपल्या प्लॅटफॉर्मवरील 2000 रुपयांपर्यंतच्या पेमेंटसाठी वन टाइम पासवर्ड (ओटीपी) बंद करणार आहे. कंपन्यांनी उचललेल्या या पावलामुळे ट्रांजेक्शन करणे खूप सोपे होणार आहे.
लवकरच विना ओटीपी करता येणार 2,000 रुपयांपर्यंतचे ऑनलाईन व्यवहार
ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टने 2000 रुपयांपर्यंतच्या व्यवहारासाठी ओटीपी ऑथेंटिकेशन पुर्णपणे काढून टाकले आहे. आता स्विगी, ओला आणि उबर या कंपन्या देखील हे स्विकारण्याच्या तयारीत आहे.
आरबीआयने ऑनलाईन पेमेंट सोपे करण्यासाठी देशातील बँकांना ओटीपी ऑथेंटिकेशन हटवण्यास मंजूरी दिली होती. पेटीएमचे वाइस प्रेसिडेंट पुनीत जैन यांनी देखील क्रेडिट कार्डद्वारे होणाऱ्या पेमेंटसाठी ओटीपी हटवण्यास तयार असल्याचे म्हटले होते. मात्र कंपनीने याविषयी अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही.
रिपोर्टनुसार, सध्या बाजारात 40 टक्के ट्रांजेक्शन हे पेटीएमद्वारे होतात.
