दीपिकाने माझ्यासारखा सल्लागार ठेवावा – रामदेव

दीपिका पादुकोणने सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक मुद्यांवर योग्य समज घेण्यासाठी माझ्यासारखा एखादा सल्लागार ठेवावा, असा सल्ला योग गुरू रामदेव बाबा यांनी दिला आहे. दिल्लीतील जवाहरललाल नेहरू यूनिवर्सिटीमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर दीपिकाने तेथे जात विद्यार्थांना पाठिंबा दिला होता.

रामदेव बाबा या विषयी म्हणाले की, दीपिकामध्ये अभिनयाच्या दृष्टीने कुशलता असणे वेगळी गोष्ट आहे. मात्र सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक मुद्यांचे ज्ञान घेण्यासाठी तिने देशाबद्दल अधिक वाचणे गरजेचे आहे. हे ज्ञान मिळवल्यानंतरच तिने मोठे निर्णय घ्यायला हवे.

ते पुढे म्हणाले की, मला वाटते की त्यांनी माझ्यासारख्या एखाद्या सल्लागाराची नेमणूक करावी, जो अशा मुद्यांवर योग्य माहिती देऊ शकेल.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला पाठिंबा देत रामदेव बाबा म्हणाले की, ज्या लोकांना सीएएचा फूल फॉर्म देखील माहिती नाही ते आज या विषयावर नरेंद्र मोदींसाठी अपशब्दांचा वापर करत आहेत. पंतप्रधान आणि गृहमंत्री स्वतः म्हणाले आहेत की, हा कायदा कोणत्याही व्यक्तीचे नागरिकत्व काढून घेण्यासाठी नाही तर नागरिकता देण्यासाठी आहे. तरी देखील लोक आग लावत आहेत.

Leave a Comment