सेरेनाने ओकलंड ओपन जिंकली, रक्कम ऑस्टेलिया आगपिडीतांना दान


अमेरिकेची स्टार टेनिसपटू सेरेना विल्यम्स हिने रविवारी ओकलंड ओपन खिताब जिंकला असून आई झाल्यावर तिचा हा पहिलाच विजय आहे. ३८ वर्षीय सेरेनाने अमेरिकेच्याच जेसिका पिगुला हिचा ६-३, ६-४ असा सरळ सेट मध्ये पराभव केला. या स्पर्धेत तिला मिळालेली ३१ लाख रुपये पारितोषिकाची रक्कम तिने ऑस्ट्रेलियातील आगपिडीत जनतेला देणार असल्याची घोषणा केली आहे.

सेरेनाने या पूर्वी २०१७ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन खिताब जिंकला होता. २३ ग्रँड स्लॅम विजेत्या सेरेनाचा सिंगल चँपियन करियर मधील ७१ वा खिताब आहे. सेरेना म्हणाली मी दीर्घकाळ टेनिस खेळते आहे आणि मला जे आवडते ते मी करू शकते याचा मला सर्वाधिक आनंद आहे. २० जानेवारी पासून सुरु होत असलेल्या ऑस्ट्रेलियन ओपन मध्ये सेरेना खेळणार आहे.

Leave a Comment