या ठिकाणी सुरू झाला जगातील सर्वात मोठा ‘रेडिओ टेलिस्कोप’

चीनमध्ये जगातील सर्वात मोठा आणि संवेदनशील रेडिओ टेलिस्कोप 3 वर्षांच्या ट्रायलनंतर सुरू करण्यात आला आहे. गुइझोऊ-प्रांतात स्थापित हा टेलिस्कोप बनवण्यासाठी 20 वर्ष लागली. सप्टेंबर 2016 मध्ये याची पहिली चाचणी झाली होती.

राष्ट्रीय विकास आणि सुधारणा आयोगाचे अधिकारी शेन जूलिन यांनी सांगितले की, जगाभरातील खगोलशास्त्रज्ञांसाठी हा टेलिस्कोप उघडण्यात येईल.

हा टेलिस्कोप प्युर्टोरिकाच्या अरेसिबो ऑब्जर्व्हेटरीपेक्षा 2.5 पट अधिक संवेदनशील आहे. प्युर्टोरिका येथील ऑब्जर्व्हेटरीमध्ये जगातील दुसरे सर्वात मोठे सिंगल-डिश रेडिओ टेलिस्कोप आहे. याचा उद्देश अंतराळात जीवन शोधण्याबरोबरच एलियन्सचा शोध घेणे हे देखील आहे. चीनचा टेलिस्कोप 1 सेंकदात 38 जीबी डेटा गोळा करण्यास सक्षम आहे. याला फाइव्ह हंड्रेड मीटर अपर्चर स्फेरिकल रेडिओ टेलिस्कोप (फास्ट) नाव देण्यात आलेले आहे. फास्टची अंतराळ रेंज 4 पट अधिक आहे.

टेलिस्कोपने आतापर्यंत 44 पल्सरचा शोध लावला आहे. प्लसर वेगाने फिरणारा न्युट्रॉन अथवा तारा असतो. जो रेडिओ तरंग आणि विद्युत चुंबकिय विकिरण उत्सर्जित करतो. याच्या 5 किमी आजुबाजूला कोणतेही शहर नाही.

फास्ट टेलिस्कोपमध्ये 4450 पॅनेल लागले असून, याचा आकार 30 फुटबॉल मैदाना एवढा आहे. याला बनवण्यासाठी तब्बल 1207 कोटी रुपये खर्च आला.

Leave a Comment