गरज ही शोधाची जननी आहे असे म्हटले जाते. मात्र गरजा कधीच संपत नसतात. या गरजा पुर्ण करण्यासाठी नवनवीन गोष्टींचा शोध लागत असतो. याच शोधांनी संपुर्ण जग बदलून गेले आहे. आजपर्यंत अशा अनेक नवनवीन गोष्टींचा शोध लागला आहे की, ज्यामुळे मानवी जीवनच बदलले. मात्र या गोष्टींचा शोध लावणारे यावर खूष नाहीत. त्यांना आज त्या गोष्टीचा पश्चाताप होत आहे. या शोधांविषयी जाणून घेऊया.

ऑफिस क्यूबिकल्स –
कार्यालयांमध्ये क्यूबिकल व्यवस्थेचे डिझाईन 1964 मध्ये रॉबर्ट प्रोप्स्ट यांनी केले होते. कर्मचाऱ्याचा खाजगीपणा आणि उत्पादकता वाढवण्यासाठी हे करण्यात आले होते. मात्र 33 वर्षानंतर 1997 मध्ये रॉबर्ट म्हणाले होते की, मोठ्या आणि मोकळ्या कार्यालयांमध्ये क्यबिकल्स सिस्टम असणे वेडेपणा आहे.

डायनामाइट –
डायनामाइटचा शोध स्वीडिश वैज्ञानिक अल्फ्रेड नोबेल यांनी लावला होता. त्यांच्याच नावाने नोबेल पुरस्करा दिला जातो. त्यांच्या या शोधामुळे प्रथम विश्वयुद्धात अनेक लोक मारले गेले. त्यांना ही गोष्ट जानवली होती की, आपल्या या शोधामुळे युद्धाला प्रोत्साहन मिळेल, म्हणून त्यांनी नोबेल शांती पुरस्काराची सुरूवात केली.

अणूबॉम्ब –
अमेरिकेच्या मॅनहटन प्रोजेक्टचे प्रमुख रॉबर्ट ओपनहायमर यांच्या टीमने अणुबॉम्बचा शोध लावला. याचा शोध लावल्यावर ते खूप खूष होते. मात्र नंतर त्यांना याचा पश्चाताप झाला. यावर प्रतिबंध आणण्याची मागणी देखील त्यांनी सरकारकडे केली होती.

शॉपिंग मॉल –
1950 च्या दशकात जगात पहिल्यांदा शॉपिंग मॉलची कल्पना विकसित करण्याचे काम विक्टर ग्रुएन नावाच्या व्यक्तीने केले. त्यांना अमेरिकन शॉपिंग मॉलचे जनक म्हटले जाते. मात्र नंतर त्यांना जानवले की, अमेरिकन मॉल्सने शहरांना नुकसान पोहचवले.

एके-47 रायफल्स –
1947 मध्ये मिखाइल कलाश्निकोवने या ऑटोमॅटिक असॉल्ट रायफलचा शोध लावला होता. याचा शोध रशियाच्या सैन्यासाठी लावण्यात आला होता. या अविष्कारामुळे मिखाइल हिरो झाले होते. मात्र 2013 मध्ये मृत्यूच्या एक वर्षाआधी त्यांनी रशियाच्या ऑर्थोडॉक्स चर्चला लिहिलेल्या चिठ्ठित सांगितले की, याद्वारे होणाऱ्या हत्यांना ते स्वतःला जबाबदार मानतात.

पेपर स्प्रे –
1980 च्या दशकात कामरान लॉमेन नावाच्या व्यक्तीने एफबीआयसाठी पेपर स्र्पे तयार केला होता. मात्र आंदोलनकर्त्यांवर याचा वापर सुरू झाल्यानंतर ते म्हणाले होते की, या कामासाठी या स्प्रेची निर्मिती झालेली नाही.

वर्ल्ड वाइट वेब –
इंटरनेटचे जनक म्हणून ओळखले जाणारे प्रोपेसर टिम बर्नर्स ली यांनी 1989 मध्ये वर्ल्ड वाइड वेबचा शोध लावला. यामुळे जगच बदलले. मात्र आता याद्वारे हॅकिंग, खोट्या बातम्या आणि इतर खतरनाक गोष्टी केल्या जात आहेत. याविषयी टिम म्हणाले होते की, माझ्या शोधामुळे होणाऱ्या विध्वंसक घटनांना पाहून मी निराश आहे. मला वाटते की मानवतेच्या सेवेला अधिक चांगले बनविण्यामध्ये इंटरनेटला अपयश आले आहे.

लॅब्रोडुडल्स –
ही एक कुत्र्यांची प्रजाती असून, ते खूपच प्रेमळ आणि बुद्धिमान असतात. त्यांना केस नसतात. यांना लॅब्रोडोर आणि पूडलच्या क्रॉस ब्रीडिंगद्वारे बनवण्यात आले आहे. ही नवीन प्रजाती वॉली कॉनरॉन यांनी विकसित केली आहे.
याविषयी वॉली म्हणाले होते की, आता लोक मोठ्या प्रमाणात ही ब्रीडिंग करत आहेत. त्यामुळे अनेक अस्वस्थ कुत्र्यांचा जन्म होत असून, त्यांना लोक रस्त्यावर सोडून देतात.

इमोजी –
कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षक स्कॉट फॅलमॅन यांनी इमोटीकॉनचा वापर केला होता. याचा इमोजीचा खूप वापर होतो. याविषयी स्कॉट म्हणाले होते की, मी जे बनवले ते नुकसानकारक नव्हते. मात्र याचा वापर खूपच वाढला आहे. त्याला मी कधीच परवानगी दिली नव्हती.

कॉमिक सॅन्स फॉन्ट –
कॉमिक सॅन्सला आतापर्यंतचे डिझाईन केला गेलेला सर्वात खराब फॉन्ट समजले जाते. याचा शोध विन्सेंट कोनारने लावला होता.
1994 मध्ये तयार करण्यात आलेल्या या फॉन्टचा हळूहळ अधिक वापर होऊ लागला. याविषयी विन्सेंट म्हणाले होते की, जर तुम्हाला हा फॉन्ट आवडत असेल, तर तुम्हाला टायपोग्राफीबद्दल काहीच माहिती नाही.

पॉप-अप जाहिरात –
ऑनलाईन साइट्सवर जाहिरातीचा प्रकार असलेल्या पॉप-अपचा शोध एथन जुकरमॅनने लावला होता. मात्र हळूहळू याचा वापर प्रत्येक साइटवर सुरू झाल्याने लोक याला वैतागले. यावर जुकरमॅनने माफी देखील मागितली होती.

विमान –
विमानाचा शोध लावणाऱ्या राइट ब्रदर्समधील एक ऑवरिल राइट यांनी जेव्हा द्वितीय विश्वयुद्धात बॉम्ब टाकण्यासाठी विमानाचा वापर होताना पाहिले, त्यावेळी ते खूप चितिंत झाले. याच्या निर्मितीवर देखील त्यांनी दुःख व्यक्त केले होते.