केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 24 जागांसाठी भरती

केंद्रीय लोकसेवा आयोगाने 24 पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांमध्ये प्रिंसिपल लायब्रेरी आणि इन्फॉर्मेशन ऑफिसर, सीनियर डिव्हिजन मेडिकल ऑफिसर (इंडो गॅस्ट्रोएंटरोलॉजी, गॅस्ट्रो-इंटेसटाईनेल सर्जरी, नेफ्रोलोजी, न्यूरोलॉजी), लेक्चरर, असिस्टेंट प्रोफेसर या पदांचा समावेश आहे.

या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जानेवारी 2020 आहे.

शैक्षणिक योग्यता –

प्रिंसिपल लायब्रेरी आणि इन्फॉर्मेशन – या पदासाठी उमेदवारांकडे मान्यता प्राप्त विद्यापीठातून लायब्रेरी सायन्समध्ये मास्टर डिग्री अथवा त्या समक्ष पदवी असणे गरजेचे आहे.

सीनियर डिव्हिजन मेडिकल ऑफिसर – उमेदवारांनी मान्यता प्राप्त विद्यापीठातून एमडी/एमएस सोबत एमसीएच अथवा डीएम असणे आवश्यक आहे.

लेक्चरर/ असिस्टेंट प्रोफेसर – 55 टक्के गुणांसह पदवीत्तोर शिक्षण + 55 टक्के गुणांसह एमएड असणे आवश्यक आहे.

वयाची अट –

प्रिंसिपल लायब्रेरी आणि इन्फॉर्मेशन या पदासाठी उमेदवाराचे वय हे 50 पेक्षा अधिक नसावे. तसेच इतर पदांसाठी उमेदवाराचे वय 45 वर्षांपेक्षा कमी असणे गरजेचे आहे. आरक्षित उमेदवारांना यात सुट मिळेल.

परिक्षा फी –

एससी/एसटी / पीडब्ल्यूडी / महिला श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्जाच्या फीमध्ये सूट असून, सामान्य आणि ओबीसी श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्ज फी  25 रुपये आहे. नेट बँकिंग अथवा एसबीआयच्या शाखेतून अर्जाची फी भरता येईल.

इच्छुक उमेदवार अधिक माहिती व अर्जासाठी यूपीएससीची अधिकृत वेबसाईट https://www.upsconline.nic.in/ ला भेट देऊ शकतात.

Leave a Comment