महिलेचा नंबर मागणाऱ्याला पुणे पोलिसांनी दिले असे उत्तर

सध्या पुणे पोलीस ट्विटरवरील आपल्या सक्रियतेमुळे चर्चेत आले आहे. आपल्या हजारजवाबी उत्तरामुळे पुणे पोलिसांचे कौतूक केले जात आहे. असेच एका महिलेचा मोबाईन नंबर मागणाऱ्या ट्विटर युजर्सला पुणे पोलिसांनी पुणेरी स्टाईलमध्ये दिलेले उत्तर सध्या व्हायरल होत आहे.

निधी दोषी नावाच्या महिला ट्विटर युजरने पुणे पोलिसांना टॅग करत धानोरी पोलीस स्टेशनचा नंबर मागितला. यावर पुणे पोलिसांनी नंबर देखील दिला.

मात्र याचवेळी एका चिकलू नावाच्या युजरने पुणे पोलिसांकडेच त्या महिलेचा नंबर मागण्याची हिम्मत दाखवली.

यावर पुणे पोलिसांनी या चिकलू नावाच्या ट्विटर युजरला उत्तर दिले की, सर, सध्यातरी आम्हाला तुमच्या फोन नंबरमध्ये अधिक इंटरेस्ट आहे. आम्हाला जाणून घ्यायचे आहे की तुम्हाला महिलेचा नंबर का हवा आहे ? तुम्ही आम्हाला थेट मेसेज करा. आम्ही तुमच्या प्रायव्हसीचा आदर करतो.

पुणे पोलिसांचे हे उत्तर चांगलेच व्हायरल होत आहे. पुणे पोलिसांच्या या ट्विटवर मुलाने आणखी एक उत्तर देत लिहिले की, एक भारतीय आणि जबाबदार नागरिक या नात्याने त्या मुलीची मी मदत करू इच्छित होतो. मात्र तुम्ही माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ लावला.

Leave a Comment