…तर उद्धव ठाकरे कधीही मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतील


अहमदनगर – राज्यात तीन पक्षांचे सरकार राजकीय तडजोड करुन सत्तेवर आले. पण, रोज कोणी न कोणी मंत्रीपदे आणि बंगल्याच्या वाटपावरुन रुसत आहे. उद्धव ठाकरेंनी जर पुढाकार घेतला नसता तर तुम्ही विरोधी पक्षातच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनो बसले असता, असे खडेबोल माजी खासदार व ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी सुनावले आहेत. तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीला त्यांनी सावधानतेचा इशारा पण दिला आहे.

बाळासाहेब थोरात आणि गडाख एका कार्यक्रमात एकत्र आले होते. यावेळी थोरातांना गडाख यांनी प्रश्न विचारला, हे सरकार टिकले का?’ तर ते म्हणाले, प्रयोग केला आहे खरा, पुढे पाहू काय होते, यावर उत्तर म्हणून गडाख म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादीवाले नीट वागले नाही तर उद्धव ठाकरे आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील.

गडाख म्हणाले, लोकांमध्ये जाऊन आमदारांनी राहिले पाहिजे. बंगल्यावरुन उगाचच वाद कशासाठी घालत आहेत. उद्धव ठाकरे यांना मी खूप दिवसांपासून ओळखत आहे. सक्रिय राजकारणाचा त्यांचा पिंड नाही. तो एक कलाकार माणूस असून, इतरांनी कुरघोड्या करू नयेत. अशाप्रकारे गडाख यांनी सहकारी पक्षांना सुनावले.

Leave a Comment