बॉक्स ऑफिसवर ‘तान्हाजी’ची षष्ठीपूर्ती


दिग्दर्शक ओम राऊत यांना तान्हाजी मालुसरे यांची शौर्यगाधा भव्यदिव्य रुपात मांडण्यात हिंदीतील पदार्पणात यश मिळाले असून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. त्याचबरोबर चित्रपटाच्या कमाईचा आकडा दिवसागणिक वाढतो आहे. फक्त तीन दिवसांत ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटाने तब्बल ६१.७५ कोटी रुपयांचा गल्ला जमवल्यामुळे हा चित्रपट पहिल्याच आठवड्यात १०० कोटींचा आकडा पार करेल, यात काही शंका नाही.


यासंदर्भातील माहिती चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी दिली असून त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, केवळ महाराष्ट्रातच नाही तर इतरही राज्यांमध्ये अजय देवगणची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. ‘तान्हाजी’ने प्रदर्शनाच्या दिवशी १५.१० कोटी रुपयांची कमाई केल्यानंतर शनिवारी २०.५७ कोटी रुपये आणि रविवारी २६.०८ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

Leave a Comment