चक्क प्लास्टिकपासून बनवले 10 पट अधिक हलके सोने

पर्यावरणाला सर्वाधिक नुकसान पोहचवणाऱ्या प्लास्टिकपासून इंधन आणि रस्ते बनविण्याचा प्रयोग झाला आहे. मात्र पहिल्यांदाच स्विर्झलँडच्या वैज्ञानिकांनी प्लास्टिकद्वारे सोने बनवण्यात यश मिळवले आहे. प्लास्टिकच्या मॅट्रिक्सला मिश्र धातूच्या रुपात वापर करून 18 कॅरेट सोने तयार करण्यात आले. जे वजनाला देखील हलके आहे व त्याची चमक देखील खऱ्या सोन्यासारखीच आहे. याला सहज पॉलिश करता येते.

वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की, हे सोने हलके असल्याने याचा वापर सोन्याची घड्याळ आणि ज्वेलरीसाठी वापरले जाईल. स्विस यूनिवर्सिटीच्या ईटीएच ज्यूरिखचे वैज्ञानिक राफेल मेजेन्गा यांनी सांगितले की, या सोन्याचे वजन पारंपारिक 18 कॅरेट सोन्याच्या जवळपास 10 पट कमी आहे. पारंपारिक मिश्रणात सर्वसाधारणपणे ¾ सोने असते व ¼ तांबे असते. ज्याची घनता जवळपास 15 ग्रॅम/सेमी3 असते. मात्र प्लास्टिकपासून बनविण्यात आलेल्या सोन्याची घनता 1.7 ग्रॅम/सेमी3 आहे. तरी देखील हे 18 कॅरेट सोने आहे.

हे सोने बनविण्यासाठी प्रोटीन फायबर आणि पॉलिमर लेटेक्सचा वापर करण्यात आला. यामध्ये सर्वात प्रथम सोन्याची नॅनोक्रिस्टलची पातळ डिस्क ठेवण्यात आली. आधी पाणी व नंतर अल्कोहोलद्वारे याला मिसळण्यात आले. त्याला कार्बन डायोक्साइड गॅसच्या उच्च दाबाने प्रवाहित करून ठोस आकारात बदलण्यात आले.

Leave a Comment