हा आहे भारतातील सर्वात हुशार चोर, कारनामा वाचून व्हाल हैराण

भारतातील सर्वात हुशार चोर कोण असेल असा प्रश्न तुम्हाला कधीना कधी पडलाच असेल ? तर या प्रश्नाचे उत्तर आहे धनी राम मित्तल. धनी राम मित्तल चक्क दोन महिने कोणालाच कळू न देता दोन महिने न्यायाधीशाच्या खुर्चीवर बसून निर्णय देत होता. आता या चोराला हुशार म्हणणार नाही तर काय म्हणार.

सांगण्यात येते की, त्याने वयाच्या 25 व्या वर्षीच चोरी करण्यास सुरूवात केली. 1964 मध्ये सर्वात प्रथम पोलिसांनी चोरी करताना पकडले. आता त्याचे वय 80 वर्ष आहे. मात्र हा चोर सध्या कोठे व कसा आहे हे कोणालाच माहिती नाही.

चोरीच्या इतिहासात सर्वाधिक वेळा अटक होणारा हा चोर आहे. 2016 मध्ये त्याला शेवटचे अटक करण्यात आले होते. मात्र तो पोलिसांना चकमा देऊन पळून गेला. धनीरामने आतापर्यंत 1 हजारपेक्षा अधिक गाड्या चोरल्याचे सांगितले जाते. खास गोष्ट म्हणजे तो केवळ दिवसाच चोरी करतो.

धनीराम बद्दल एक रोचक कथा आहे. अनेक वर्षापुर्वी त्याला अटक करून न्यायालयात सादर करण्यात आले. अनेकदा न्यायालयात आणले गेले असल्याने न्यायाधीशांनी देखील चिढून त्याला बाहेर जाण्यास सांगितले. त्यानंतर त्याच्यासोबत असलेले पोलीस देखील बाहेर निघून आले. त्यानंतर तो गायब झाला. जेव्हा न्यायालयात त्याचे नाव उच्चारण्यात आले, त्यावेळी पोलीस देखील सुन्न झाले. सांगण्यात येते की, त्याने पोलिसांना सांगितले की न्यायाधीशांनी त्याला जाण्यासच सांगितले होते.

त्याने एलएलबीचे देखील शिक्षण घेतले होते. याशिवाय हँडराइटिंग तज्ञ आणि ग्राफोलॉजीमध्ये देखील शिक्षण घेतले होते. या चोराचा सर्वाधिक प्रसिद्ध कारनामा म्हणजे तो 2 महिने न्यायाधीशाच्या खुर्चीवर बसून निर्णय देत होता व याविषयी कोणालाच माहिती नव्हते. त्याने खोटी कागदपत्रे बनवून हरियाणाच्या झज्जर न्यायालयातील एडिशनल सेशन न्यायाधीशाला 2 महिन्यांच्या सुट्टीवर पाठवले व स्वतः न्यायाधीश झाला.

त्याने 2 महिन्यात 2000 पेक्षा अधिक गुन्हेगारांना जामिनावर सोडले. मात्र जेव्हा प्रकरण समोर आले, त्यावेळी तो तेथूनही पळून गेला. त्यानंतर ज्या गुन्हेगारांना त्याने जामीन दिला होता त्यांना परत पकडण्यात आले.

 

Leave a Comment