नथुराम गोडसेंच्या भूमिकेस राजकुमार रावचा नकार


अभिनेता राजकुमार राव हा वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारण्यासाठी ओळखला जातो. त्याचबरोबर तो सध्या विचार करून चित्रपटांची निवड करत आहे. याचे कारण ‘स्त्री’ चित्रपटानंतर रिलीज झालेल्या त्याच्या सहामधील पाच चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली नसल्यामुळे राजकुमार संतोषी यांनी ऑफर केलेल्या ‘गांधी वर्सेस गोडसे’मध्ये काम करण्यास त्याने नकार दिला आहे. राजकुमारला नथुराम गोडसेंची भूमिका संतोषी यांनी ऑफर केली होती. पण राजकुमार करिअरच्या या स्टेजवर नकारात्मक भूमिका करू इच्छित नाही.

नुकतेच ‘जजमेंटल है क्या’मध्ये राजकुमारने सायको किलरची भूमिका केली होती. त्याच्या चाहत्यांना ती आवडली नाही. त्यामुळे राजकुमारने संतोषी यांना नकार दिला असावा. त्याचबरोबर गोडसेंविषयी राजकुमारने आपले मत अजून व्यक्त केले नाही. राजकीयदृष्ट्या पाहिले तर गोडसेंना उजव्या विचारसरणीने नेहमी नायक आणि डाव्या विचारसरणीने खलनायक म्हटले आहे. दुसरीकडे राजकुमारने कधीच आपली राजकीय विचारसरणी सांगितलेली नाही.

Leave a Comment