संक्रांतीला तीळ खाण्याआधी जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे

मकर संक्रांतीचा सण अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या निमित्ताने तिळाचे लाडू, रेवडी, तीळ-गुळाची चिक्की असे पदार्थ बनवले जातात. लोक बाजारातून देखील तिळाचे बनलेल्या वस्तू खरेदी करतात. यंदा तुम्ही या पदार्थांचा आस्वाद घेण्याआधी या गोष्टी जाणून घ्या.

Image Credited- Navbharattimes

मधुमेह आणि उच्च रक्तदाब –

तिळातील फायबर आणि मॅग्नेशियम इंन्सुलिन आणि ग्लूकोज लेव्हल कंट्रोल करण्यास मदत करते. यामुळे मधुमेहाची लेव्हल बिघडण्याचा धोका कमी होतो. याशिवाय उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास देखील याचा फायदा होता.

Image Credited- Navbharattimes

दातांसाठी फायदेशीर –

तीळ हिरड्यांना मजबूत करण्यास मदत करते. सोबतच तोंडाची दुर्गंधी, हिरड्यातून रक्कत आणि दात खराब होणे सारख्या गोष्टींशी लढण्यास मदत करते.

Image Credited- Navbharattimes

पोटाची काळजी –

तिळाचे सेवन शरीराची पाचन क्रिया व्यवस्थित ठेवण्यास मदत करते. यामूळ कॉन्स्टिपेशनची समस्या दूर होते.

Image Credited- Navbharattimes

 

त्वचेसाठी फायदेशीर –

तीळ केवळ आरोग्यच नाही तर त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. यातील अँटी बॅक्टेरिअल आणि अँटी ऑक्सिडेंट प्रॉपर्टीज पिंपल्स, ऐक्ने आणि गडद डाग दूर करून त्वचा चांगली ठेवण्यास मदत करते.

Image Credited- Navbharattimes

केसांसाठी –

तिळाचे तेल केसांना लावल्याने त्यांची मुळे मजबूत होतात. सोबतच केसांची शाइन वाढते. केस गळणे, कोंडा या सारख्या समस्या देखील दूर होतात.

 

Image Credited- Navbharattimes

तिळाचे नुकसान –

तीळ प्रत्येकाच्या शरीराला फायदेशीर ठरेल असे नाही. काही लोकांना यामुळे एलर्जी देखील होऊ शकते.

Image Credited- Navbharattimes

रक्त दाब वाढण्याची शक्यता –

कमी रक्तदाब असलेल्या लोकांसाठी तीळ नुकसानकारक ठरू शकते. अशा लोकांनी अधिक तीळ खाणे टाळावे व डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image Credited- Navbharattimes

अतिसार –

तीळ पोटाला साफ करत असले तरी यामुळे त्रास देखील होऊ शकतो. अधिक प्रमाणात तीळ खाल्ल्याने पाचन क्रिया जलद होऊन अतिसार होऊ शकतो.

Image Credited- Navbharattimes

केस अधिक गळणे –

तिळामुळे केस गळणे थांबत असले तरी अनेकदा केस अधिक गळण्यास देखील सुरूवात होते. तिळाचे तेल पोर्स ब्लॉक करून स्कॅल्प इरिटेशनला कारणीभूत ठरू शकते. ज्यामुळे केस गळती वाढते. याचमुळे हे तेल अर्ध्या तासापेक्षा अधिक वेळ न लावण्याचा सल्ला दिला जातो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment