‘मुंबई सागा’मधील जॉनचा लूक सोशल मीडियावर व्हायरल


नुकतेच संजय गुप्ता दिग्दर्शित ‘मुंबई सागा’ चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. अभिनेता जॉन अब्राहमचा क या नव्या पोस्टरमधून रिलीज करण्यात आला आहे. जॉन एका वेगळ्याच अंदाजात या पोस्टरमध्ये पाहायला मिळत आहे. कपाळावर टिळा, त्याची रोखलेली नजर त्याच्या भूमिकेबाबत अधिक उत्सुकता निर्माण करत आहे. जॉनच्या या लूकची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा असून सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल होत आहे. ट्विटरवर या पोस्टरनंतर प्रेक्षकांकडून जॉन आणि इमरान हाशमीच्या एकत्रित पोस्टरची मागणी होत आहे.


दिग्दर्शक संजय गुप्ता, १९८०-९०च्या दशकात मुंबईत झालेल्या गँगवॉरची कहाणी ‘मुंबई सागा’मधून मोठ्या पडद्यावर घेऊन येत आहेत. जॉन अब्राहम, इमरान हाशमीशिवाय ‘मुंबई सागा’मध्ये इतरही अनेक मोठे कलाकार भूमिका साकारणार आहेत. जॅकी श्रॉफ, सुनिल शेट्टी, प्रतिक बब्बर, गुलशन ग्रोवर, रोनित रॉय आणि अमोल गुप्ते हे कलाकार रुपेरी पडद्यावर एकत्रित पाहायला मिळणार आहेत.

संजय गुप्ता यांनी ‘मुंबई सागा’आधी हृतिक रोशन आणि यामी गौतम स्टारर ‘काबिल’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. संजय गुप्ता यांना गँगस्टरच्या चित्रपटांचे मास्टरच मानले जाते. संजय गुप्ता यांनी ‘कांटे’, ‘शूटआऊट ऍट वडाळा’, ‘शूटआऊट ऍट लोखंडवाला’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. १९ जून २०२० रोजी ‘मुंबई सागा’ रिलीज होणार आहे.

Leave a Comment