चंद्र किंवा शुक्रावर जाणार इराणची जॅस्मीन मोघबेली


ह्यूस्टन- जेव्हा इराणी जनरल कासिम सुलेमानीला अमेरिकेने मारले आहे, तेव्हापासून दोन्ही देशांमधील तणाव अधिकच वाढला आहे. पण त्यातच एक चांगली बातमी समोर आली आहे. नासाच्या अंतराळ मिशनसाठी तयार झाली आहे. ती पहिली इराणी-अमेरिकी अंतराळवीर असेल, जी चंद्र किंवा शुक्रावर जाईल.

हेलिकॉप्टर गनशिप पायलट म्हणून जॅस्मीनने अफगानिस्तानासाठी 150 मिशन पूर्ण केले आहेत. मैसाचुसेट्स इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीतून एअरोनॉटिकल इंजीनिअरिंगमध्ये ग्रॅजुएट झालेली 36 वर्षीय जैस्मीनचा जन्म जर्मनीमध्ये झाला होता. 1979 मध्ये इस्लामिक क्रांतीदरम्यान त्यांचे कुटुंब इराणमध्ये गेले होते. पण मोघबेली नंतर न्यूयॉर्कमध्ये शिकली. ती 15 वर्षांची असताना एका स्पेस कँपमध्ये सामील झाली होती.

मोघबेलीने 9/11 च्या 4 वर्षानंतर 2005 मध्ये सेनेत कमीशन मिळवले. तिचे आई-वडील तेव्हा मध्य-पूर्वचे असल्यामुळे घाबरले होते, पण अमेरिकी लष्करात त्यांना स्थान मिळाले. तिने काही दिवसांपूर्वीच आपला साथीदार सॅमसोबत लग्न केले. नासाने मोघबेलीसह 11 जणांची 18 हजार अर्जदारांमधून निवड केली आहे.

Leave a Comment