चंद्रावर नेण्यासाठी अब्जाधीश शोधत आहे जोडीदार, तुम्हीही करू शकता अर्ज

एक जापानी अब्जाधीश सध्या आपल्या एका जाहिरातीमुळे चर्चेत आहे. जापानचा उद्योगपती युसाकू मिझावा आपल्यासाठी एका जोडीदाराच्या शोधत असून, जिला तो आपल्यासोबत चंद्रावर घेऊन जाणार आहे. यासाठी त्याने सोशल मीडियावर जाहिरात देखील दिली आहे. 20 पेक्षा अधिक वयाच्या मुली यासाठी अर्ज देखील करू शकतात.

युसाकू मिझावाचे काही दिवसांपुर्वीच जापानी अभिनेत्रीसोबत ब्रेकअप झाला आहे. युसाकू आता अन्य जोडीदाराच्या शोधात असून, यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 जानेवारी 2020 आहे.

युसाकूला 3 मुले आहेत. तो म्हणाला की, मी आजपर्यंत मला हवे त्या पद्धतीने माझे आयुष्य जगलो आहे. मी आता 44 वर्षांचा असून, मला आता एकटेपणा जाणवत आहे. एकटेपणाची भावना माझ्यावर वरचढ ठरत असून, यामुळे मी ठरवले आहे की, एका महिलेवर प्रेम करणे गरजेचे आहे.

युसाकूने ट्विटरवर एक जाहिरात शेअर केली असून, त्याने लिहिले आहे की, तुम्हाला चंद्रावर जाणारी पहिली महिला बनायचे आहे का ? यासाठी त्याने एक लिंक देखील दिली आहे.

अर्ज करण्याची तारीख 17 जानेवारी 2020 असून, यानंतर मार्चपर्यंत मुलीची निवड केली जाईल. यासाठी युसाकू सर्व मुलींसोबत डेटवर जाणार आहे. युसाकू एलॉन मस्कच्या स्पेसएक्समधून 2023 मध्ये चंद्रावर जाणारे पहिले व्यक्ती असणार आहेत.

Leave a Comment