सावधान ! स्मार्ट कारद्वारे होत आहे हेरगिरी

सध्या बाजारात इलेक्ट्रिक कार्ससोबतच इंटरनेट कनेक्टेड कार्सची मागणी वाढत आहे. इंटरनेट कारमुळे अनेक गोष्टी सुलभ होतात. यामुळे तुम्हाला अनेक अलर्ट मिळत असतात. मात्र इंटरनेट कारमुळे तुमचा खाजगी डेटा देखील चोरीला जाण्याची शक्यता असते.

कंपन्या तुमचा डेटा कलेक्ट करून देखील कमाई करू शकतात. स्मार्ट टिव्ही, रेफ्रिजरेटर, स्पीकर्स आणि स्मार्टफोन देखील तुमचा डेटा कलेक्ट करतो. आपली खाजगी माहिती चोरी अथवा विकली गेल्यास यावर आपले नियंत्रण राहत नाही. रिपोर्टनुसार, स्मार्ट कार चाकांवर चालणाऱ्या स्मार्टफोन बनत आहेत. कार विमा कंपन्या आणि कारची निर्मिती करणाऱ्यांना हवे तेव्हा अ‍ॅप्सच्या मदतीने डेटा पाठवतात.

कार कसे करते हेरगिरी  ?

मागील दोन दशकांमध्ये कार्समध्ये नवनवीन सेंसर्स जोडले जात आहेत. कारमध्ये जोपर्यंत ‘बिल्ट इन इंटरनेट’ नसेल, तोपर्यंत या कार निर्मात्यांशी संपर्क साधू शकत नाहीत. मात्र आता बाजारात येणाऱ्या नवीन कार या बिल्ट इन इंटरनेटसोबतच येत आहेत.

कार सर्वात सोफेस्टिकेटेड कॉम्प्यूटर आहे. कारमध्ये मल्टिपल कनेक्टेड ब्रेन असतात. जे दर तासाला 25 जीबी पर्यंत डेटा जनरेट करू शकतात. या कनेक्टेड कारमध्ये स्वतःचे डेटा सिम असते. आता भारतात देखील कनेक्टेड कारची मागणी वाढली आहे. त्यामुळे याद्वारे होणारी हेरगिरी देखील वाढणार आहे.

कारद्वारे जमा करण्यात आलेला सर्वच डेटा धोकादायक नाही. जसे की, कारची एक्सलरेशन आणि वेगाची माहिती. कार कंपन्या या डेटाचा उपयोग मॅकेनिकल इंप्रुवमेंटसाठी करतात. मात्र स्मार्टफोनशी कनेक्ट करताच तुमचे लोकेशन, फोनचा डेटा, कॉन्टॅक्ट ही सर्व माहिती इंफोटेंमेंट सिस्टममध्ये कॉपी होते. येथेच धोका निर्माण होतो.

कंपन्या ग्राहकांची कोणती माहिती घेत आहे, याविषयी माहिती देत नाही. रिपोर्टनुसार, नेव्हिगेशन सिस्टमचा वापर करत नसताना देखील इंटरनेट कनेक्टेड कार ग्राहकांचे लोकेशन रेकॉर्ड करते.

 

Leave a Comment