शॉर्ट व्हिडीओसाठी इंस्टाग्रामने आणले भन्नाट फीचर

फेसबुकच्या मालकीची कंपनी इंस्टाग्रामने टिकटॉकप्रमाणे बुमरँग स्टोरीज फीचर रोल आउट केले आहे. या फीचरमध्ये SloMo, Echo आणि Duo असे पर्याय देण्यात आलेले आहेत. या फीचर्सच्या मदतीने स्टोरीजचे व्हिडीओ ट्रिम करता येणार आहेत.

बुमरँग फीचर कॅमेऱ्याचा एक खास फॉर्मेट आहे. इंस्टाग्राम या क्रिएटिव्हिटीला वाढवून बुमरँग फीचरमध्ये नवीन प्रकारे स्वतःला एक्सप्रेस करण्यासाठी खास फीचर देत आहे.

इंस्टाग्रामचा हा नवीन फिल्टर पर्याय बुमरँग कॉम्पोजरच्या इंस्टाग्राम स्टोरीज कॅमेरामध्ये आहे. SloMo फीचरच्या मदतीने बुमरँग व्हिडीओला त्याच्या वास्तविक स्पीडपेक्षा अधिक स्पीडमध्ये बदलता येईल. Echo फीचरच्या मदतीने डबल व्हिजन इफेक्ट मिळेल. या फीचरमुळे इंस्टाग्राम युजर्स बुमरँगला ट्रिम आणि सोबतच त्याची स्पीड व लेंथ देखील बदलू शकतील.

या नवीन फीचरचा वापर करण्यासाठी युजर्सला इंस्टाग्रामच्या कॅमेरा पर्यायात जाऊन बुमरँग व्हिडीओ काढावा लागेल. त्यानंतर हे पर्याय वापरता येतील.

Leave a Comment