या महिलेने रचला 1000 दिवसात 1000 गाणी गाण्याचा विक्रम

दुबई येथे राहणाऱ्या एका भारतीय महिलेने 1000 दिवसात 1000 गाणी गाण्याचा विक्रम केला आहे. 48 वर्षीय स्वप्ना अब्राहम यांनी 1000 दिवसात 1000 गाणी लिहिली, कंपोज केली आणि त्यांना गायली देखील. हे सर्व स्वतः एकटीने केले. या विक्रमासाठी स्वप्ना यांचे नाव गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आले आहे.

स्वप्ना यांचा हा प्रवास 8 एप्रिल 2017 ला सुरू झाला आणि 2 जानेवारी 2020 ला पुर्ण झाला. त्या लवकरच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या विक्रमाच्या नोंदीसाठी अर्ज करणार आहेत.

Day #1000 – We Are One Swapna Abraham's #1000songsin1000days challenge by the grace of God

Posted by 1000 Songs in 1000 Days on Friday, January 3, 2020

तसे पाहिले तर त्यांनी 1000 पेक्षा अधिक गाणी गायली आहेत. या 1000 दिवसात लहान मुलांसाठी त्यांनी वेगळी गाणी गायली. यावेळी त्यांनी एका दिवसात 22 गाणी गाण्याचा देखील विक्रम केला. स्वप्ना दुबईच्या एका मॅनेजमेंट सॉल्युशन कंपनीत काम करतात.

त्या म्हणाल्या की, मागील 24 वर्षांपासून प्रोफेशनल संगीताशी जोडलेले आहे. 22 एल्बम रिलीज केल्यानंतर एक कलाकार म्हणून काहीतरी कमी असल्यासारखे वाटायचे. त्यामुळे काहीतरी आवाहनात्मक करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या विक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे ही 1000 गाणी एकमेंकापेक्षा वेगळी आहे.

Leave a Comment