असा आहे टीम इंडियाचा न्यूझीलंड दौरा


नवी दिल्ली – रविवारी रात्री उशिरा न्यूझीलंड दौऱ्यातील टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. सलामीवीर रोहित शर्माचे या संघात पुनरागमन झाले आहे. तर यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनला वगळण्यात आले आहे. दरम्यान, न्यूझीलंड दौऱ्यात भारतीय संघ ५ टी-२०, ३ एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), लोकेश राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, रविंद्र जाडेजा आणि शार्दुल ठाकूर.

टीम इंडियाचा न्यूझीलंड दौरा – टी-२० मालिका

  • पहिली टी-२० – ऑकलंड – २४ जानेवारी
  • दुसरी टी-२० – ऑकलंड – २६ जानेवारी
  • तिसरी टी-२० – हॅमिल्टन – २९ जानेवारी
  • चौथी टी-२० – वेलिंग्टन – ३१ जानेवारी
  • पाचवी टी-२० – माऊंट माउंगानुई – ०२ फेब्रुवारी

 

एकदिवसीय मालिका –

  • पहिला एकदिवसीय सामना – हॅमिल्टन – ०५ फेब्रुवारी
  • दुसरा एकदिवसीय सामना – ऑकलंड – ०८ फेब्रुवारी
  • तिसरा एकदिवसीय सामना – माऊंट माउंगानुई- ११ फेब्रुवारी

 

कसोटी मालिका –

  • पहिली कसोटी – २१ ते २५ फेब्रुवारी – वेलिंग्टन
  • दुसरी कसोटी – २९ फेब्रुवारी ते ०४ मार्च – ख्राइस्टचर्च

Leave a Comment