लुप्त होत असलेल्या प्रजातीच्या 100 वर्षीय कासवाने दिला 800 पिल्लांना जन्म


कॅलिफोर्निया- लुप्त होत असलेल्या आपल्या प्रजातीला 80 किलो वजनाच्या आणि 100 वर्षीय एका कासवाने पुनर्जिवीत केले आहे. एक-दोन नाही तर तब्बल 800 कासवांना डिएगो नावाच्या या कासवाने जन्म दिला.

चेलोनोएडिस हूडेनसिस नावाच्या प्रजातीचा डिएगो कासव आहे. या प्रजातीचे 50 वर्षांपूर्वी फक्त 2 नर आणि 12 मादी जिवंत होते. हे गालापोगास आयलँडवर एवढ्या मोठ्या परिसरात राहत होते की, यांची संख्या वाढण्याची शक्यता फार कमी होती. त्यामुळे डिएगोला आणि इतर 14 कासवांना 1965 मध्ये कॅप्टिव्ह ब्रीडिंग प्रोग्राम अंतर्गत दक्षिण कॅलिफोर्नियामधील सांता क्रूज आयलँडवरील प्राणी संग्रहालयात आणण्यात आले. येथे डिएगोला 12 मादी कासवांसोबत ठेवण्यात आले.

पार्कच्या रेंजरने सांगितले की, कासवांची संख्या या दरम्यान 2000 वर गेली आणि फक्त डिएगोनेच यात 800 कासवांना जन्म दिला. 5 दशकापर्यंत आपल्या प्रजातीला लुप्त होण्यापासून वाचवणाऱ्या डिएगोला यावर्षी मार्चमध्ये सेवानिवृत्त केले जात आहे. त्यानंतर याला परत आपल्या घरी म्हणजेच गालापोगास आयलँडवर पाठवले जाईल.

Leave a Comment