एवढ्या कोटींना विकली जाणार ब्रिटनची सगळ्यात महाग हवेली

चीनी प्रॉपर्टी टायकून चेउंग चुंग किउ हे लंडनमधील 45 खोल्यांची एक हवेली खरेदी करण्यास तयार झाले आहेत. यासाठी ते तब्बल 1850 कोटी रुपये (जवळपास 20 कोटी पाउंड) मोजणार आहेत. हा करार पुर्ण झाल्यानंतर हे ब्रिटनमधील आतापर्यंतचे सर्वात महागडे घर असले.

ही 7 मजली हवेली 1830 मध्ये बांधण्यात आली होती. यामध्ये 45 खोल्यांसह 20 बेडरूम, 1 स्विमिंग पूल, खाजगी हेल्थ स्पा, जिम, लिफ्ट आणि कार्ससाठी अंडरग्राउंड पार्किंग आहे.

हे घर लंडनच्या केसिंगटन गार्डनच्या दक्षिणेला आहे. याच्या 68 खिडक्यांनी पार्कचे सुंदर दृश्य दिसते. याचे इंटेरियर फ्रान्सचे प्रसिद्ध डिझाईनर अलबर्ट पिंटोने बनवले होते. या घराचे मालक सौदी अरबचे क्राउन प्रिन्स सुल्तान अब्दुल अजीज यांचे 2011 ला निधन झाले. लेबनानचे 2 वेळा पंतप्रधान राहिलेले रफीक हरीरी देखील या घराचे मालक होते.

Leave a Comment