आता सैन्यातील जवान आणि पोलिसांना देखील वाहनांवर फास्टॅग लावणे अनिवार्य

सैन्याचे जवान अथवा पोलीस कर्मचाऱ्यांना आता टोल नाक्यावरून खाजगी वाहनातून जाताना ओळखपत्र दाखवून जाता येणार नाही. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यावर टोल वसूल करणाऱ्या सर्व कंपन्यांना गाइडलाइन पाठवली आहे.

यानुसार, सैन्य अथवा पोलीस दलातील कर्मचारी खाजगी वाहनाने टोल नाका पार करत असेल आणि त्यांच्या गाडीवर फास्टॅग लावलेले नसेल तर त्यांना रोख रक्कम लेनमधूनच जावे लागेल. फास्टॅग लेनमधून गेल्यास त्यांना दुप्पट टोल द्यावा लागेल.

जर सैन्याचे जवान कामावर असेल आणि सरकारी वाहनात असेल तर त्यांच्याकडून टोल वसूल केला जाणार नाही. मात्र या वाहनांवर फास्टॅग लावावा लागेल. फास्टॅगची व्यवस्था सुरू होण्याआधी सैन्याचे जवान ड्यूटीवर नसताना देखील सरकारी ओळखपत्र दाखवून खाजगी वाहनाने विना टोल भरता जात असे. मात्र अनेक ठिकाणांवरून बनावट ओळखपत्रांची तक्रार आल्याने नियमात बदल करण्यात आले.

सध्या खूप कमी सरकारी वाहनांवर फास्टॅग लावण्यात आलेले आहे.

 

Leave a Comment