हिऱ्यात कोरली भारतमाता आणि मोदींची प्रतिमा


फोटो सौजन्य दै. भास्कर
गुजरातमधील हिरे उद्योजक केयूर मियानी व आकाश सलिया या दोघा तरुणानी त्यांच्या जवळ असलेल्या एका अमोल हिऱ्यामध्ये भारत माता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा कोरली असून हा हिरा ते पंतप्रधान मोदी याना भेट देणार आहेत.

केयूर यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या आजोबांनी हा तीन कॅरेटचा कच्चा हिरा १९९८ मध्ये ४५ हजारांना विकत घेतला होता. तेव्हाच त्यात भारताचा नकाशा असल्याचा भास होत होता. १४ वर्षानंतर केयूर आणि आकाश यांनी लेझर इंस्क्रीप्शन तंत्रज्ञानाचा वापर करून हा भारताचा नकाशा स्पष्ट कोरला. त्यावेळी हिरा कट केल्यामुळे १.४८ कॅरटचा झाला.

योगायोगाने मोदी ज्यावेळी पंतप्रधान बनले आणि त्यांनी सुरु केलेल्या बेटी बचाव, स्वच्छता अभियान, व विविध जनकल्याण योजनाचा प्रभाव केयूरवर पडला आणि त्यांनी भारताच्या नकाशात मध्यभागी मोदी यांची प्रतिमा कोरण्याचा निर्णय घेऊन तो अमलात आणला. त्यासाठी रोज पाच तास असे तीन महिने कष्ट करावे लागले. आजच्या बाजारात या हिऱ्याची किंमत १० हजार डॉलर्स आहे. हा हिरा पंतप्रधान मोदी याना भेट देणार असल्याचे केयूर यांनी सांगितले.

Leave a Comment