सीइएस २०२० मध्ये सादर झाली इलेक्ट्रिक सायकल


लासवेगास येथे सुरु असलेल्या सीईएस २०२० मध्ये फ्रांस च्या कोलीन कंपनीने इलेक्ट्रिक सायकल सादर केली आहे. वजनाला हलकी तरी पॉवरफुल अश्या या सायकल मध्ये रायडिंग संबंधित अनेक सेफ्टी फिचर्स दिली गेली आहेत. या सायकलचे प्रीबुकिंग सुरु झाले आहे. तिच्यासाठी २ हजार युरो म्हणजे १. ५७ हजार रुपये मोजावे लागणार आहेत.

या सायकलचे वजन १९ किलो असून तिला ५२९ डब्ल्यूएचची रीमुव्हेबल बॅटरी दिली गेली आहे. ही सायकल अडीच तासात पूर्ण चार्ज होते आणि फुल चार्जवर १०० किमी धावते. ही सायकल पूर्ण आटोमॅटिक आहे. तिला इंटिग्रेटेड हाय डेफिनेशन ३.२ इंची डिस्प्ले स्क्रीन दिला गेला आहे. तो वॉटर आणि डस्टप्रूफ आहे. यात ट्रान्सलेटीव्ह तंत्राचा वापर केला गेला आहे त्यामुळे सूर्यप्रकाशात सुद्धा डिस्प्लेवर दिसू शकणार आहे. ब्ल्यू टूथच्या सहाय्याने तो स्मार्टफोन बरोबर कनेक्ट करता येतो. त्यात फोनची बॅटरी, कॉल, मेसेज डीटेल्स दिसतील.

या इलेक्ट्रिक सायकलला जीपीएस ट्रॅकर दिला गेला आहे. त्यामुळे ती कुणी चोरायचा प्रयत्न केला तर सायकलचे लोकेशन दिसू शकणार आहे. यात जिओ लोकेशन फिचर दिले गेले आहे. या सायकलमध्ये युएसबी पोर्ट सुविधा आणि स्पीड वाढविण्यासाठी सेन्सर असून सायकलला ७ वर्षांची वॉरंटी आहे.

Leave a Comment