जळून खाक झालेल्या जंगलात पुन्हा फुलतेय जीवन


सर्व फोटो सौजन्य दै.भास्कर
गेले पाच महिने ऑस्ट्रेलियातील जंगले पेटली आहेत आणि नियंत्रणाबाहेर गेलेल्या या आगीने जंगलाचा पुरा घास घेतला आहे. जळून राख झालेल्या या जंगलात निसर्गाने त्याने नवसृजनाचे काम सुरु केले असून या जंगलातील जळलेल्या झाडांच्या खोडातून, मुळातून पुन्हा नवजीवन फुलू लागले आहे. विशेष म्हणजे या आगीत ६३ हजार चौरस किलोमीटर जंगल जळून गेले आहे मात्र पुन्हा नव्याने अंकुर फुटू लागल्याचे आशादायक चित्रही दिसते आहे. येथील ७१ वर्षीय मरे लोबे यांनी या नवसर्जनचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले असून त्यांना अनेकांनी शेअर केले आहे.


लोबे हे न्यू साउथ वेल्स भागात राहतात. सेंट्रल कोस्टमधील त्यांच्या घराची परिस्थिती काय आहे हे पाहायला डिसेंबर मध्ये ते गेले तेव्हा निसर्गाने त्याचे सर्जनचे काम सुरु केल्याचे त्यांना दिसून आले. जळलेल्या झाडांच्या खोडावर, मुळांवर नवीन हिरवी पाने, गुलाबीसर रंगाची कोवळी पालवी आणि जमिनीवर अनेक प्रकारची छोटी झुडुपे उगविलेली त्यांना दिसली. जंगल पुन्हा जीव धरू लागल्याची ती आशादायक खूण होती.


ऑस्ट्रेलियाच्या या वणव्यात आत्तापर्यंत २८ लोकांचे प्राण गेले आहेत आणि दोन हजाराहून अधिक घरे जळून राख झाली आहेत. प्राणी किती मेले हे कोण मोजणार? युनिव्हर्सिटी ऑफ शेफिल्ड मधील ईकोलोजी तज्ञ डॉ. किंबर्ले म्हणाले, या झुडुपांच्या जातींनी लाखो वर्षे आगीशी सामना केला आहे. आगीत जळायचे आणि पुन्हा अंकुरायाचे ते अधिक ताकदीने असेच त्यांचे जीवनचक्र आहे. ही सतत चालणारी प्रक्रिया असून जीवन चिरंतर आहे याचे प्रतिक आहे.

Leave a Comment