काशी विश्वनाथ स्पर्श दर्शनासाठी ड्रेस कोड


फोटो सौजन्य झी न्यूज
वाराणसीच्या जगप्रसिध्द काशी विश्वनाथ मंदिरात स्पर्श दर्शन करू इच्छिणाऱ्या भाविकांना दर्शनासाठी ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय रविवारी झालेल्या काशी विद्वत परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

त्यानुसार आता स्पर्शदर्शन सकाळी ११ पर्यंत घेता येणार असून त्यानंतर पूजा झाल्यावर स्पर्श दर्शन घेता येणार नाही. त्यासाठी महिलांना साडी तर पुरुष भाविकांना धोतर आणि कुर्ता घालावा लागेल. पँट, जीन्स, शर्ट घालून आलेल्या पुरुषांना स्पर्श दर्शन घेता येणार नसले तरी मंदिरात दुरून ते विश्वेशवरचे दर्शन घेऊ शकणार आहेत.

उजैन येथील महाकाळ मंदिरात याच प्रकारे ड्रेस कोड पूर्वीच लागू केला गेला आहे. स्पर्श दर्शन घेताना नं शिवलेला कपडा परिधान करण्याची प्राचीन पद्धत आहे. दक्षिण भारतात अनेक मंदिरात पूजा करू इच्छिणाऱ्या अथवा नुसते दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांनाही विशिष्ट प्रकारचे कपडे घालून दर्शन घेण्याची प्रथा पूर्वीपासून प्रचलित आहे.

Leave a Comment