तुम्ही पहिला आहे का पंधरा वर्षाचा अब्जाधीश ?


आपल्या सारख्या सर्वसामान्यांना फिल्मी ताऱ्यांना भेटण्याची खूप इच्छा असते, त्याचबरोबर आपल्याकडे खूप पैसा असावा आणि एषोआरामात आपले जीवन जगण्याचे स्वप्न देखील असते. पण आपली स्वप्न मेहनत केल्याशिवाय पूर्ण होत नाही. पण दुबईतील १५ वर्षाचा मुलगा याला अपवाद ठरला आहे. या मुलाचे नाव राशिद बेल्हासा असे असून तो स्वप्नवत नाही सत्यता असे जीवन जगतो आहे. त्याचबरोबर अनेक हॉलीवूड-बॉलीवूडमधील कलाकारांना भेटत असतो.

दुबईत राहणाऱ्या या मुलाला मनी किक्स या नावाने देखील ओळखले जाते. दुबईचे बांधकाम व्यावसायिक आणि अब्जाधीश सैफ अहमद बेल्हासा यांचा मुलगा राशिदच्या रॉयल लाइफस्टाईलची चर्चा जगभरात होते. ज्या वयात मुळे अभ्यासाचे टेन्शन घेऊन डोकी फोडत असतात त्याच वयात तो जगभरातील कलाकारांच्या सोबत भटकत असतो.

बॉलीवूडचा दबंग खान म्हणजेच सलमान खानचा राशिद मोठा फॅन आहे आणि जेव्हा कधी सलमान दुबईला जातो तेव्हा सलमान त्याची आवर्जून भेट घेतो. काहीवेळा तर स्वत: राशिद मुंबईला येऊन सलमानची भेट घेतो. सलमान सोबतचे काही फोटो त्याने सोशल मीडियावर पोस्ट देखील केले आहेत.

युट्युबवर राशिदचा मनी किक्स नावाचा चॅनल देखील आहे. ज्याचे लाखोच्या घरात सबस्क्राईबर देखील आहेत. राशिद या चॅनलच्या माध्यमातून आपल्या लाईफस्टाईलशी निगडीत अनेक व्हिडीओ शेअर करत असतो. त्याचसोबत राशिद फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर देखील एक्टिव्ह असतो.

इंस्टाग्रामवर राशिदचे ८ लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. राशिदकडे ७० जोडी एअर जॉर्डनचे बूट आहेत. तो आपल्या वडिलांच्या खाजगी विमानातून फिरतो. राशिदकडे फरारी कार देखील आहे. तो स्नीकर्सचा मोठा शौकिन आहे. त्याचबरोबर त्याचे स्वतःचे ऑनलाइन शॉपिंग स्टोर देखील आहे, ज्याच्या माध्यमातून बॅग आणि स्नीकर्सची विक्री केली जाते.

Leave a Comment