दोन वर्षांपासून भिक मागणार हा युवक निघाला कोट्याधीश


अंबाला – हरियाणाच्या अंबाला कँटच्या जुन्या धान्य बाजारामध्ये एक तरुण मागील दोन वर्षांपासून भीक मागणारा युवक कोट्याधीश असल्याचे समोर आले आहे. दोन बहिणींचा एकुलता एक भाऊ आजमगडचा रहिवासी आहे. त्याचे खरे नाव धनंजय ठाकूर आहे, परंतु प्रवासी आणि स्थानिक लोक त्याला जटाधारी असे संबोधत. वडील राधेश्याम सिंह हे कोलकातामधील एका मोठ्या कंपनीत एचआर आहेत. शुक्रवारी धनंजयची लहान बहीण नेहा सिंह जेव्हा त्याला लखनौहून घेण्यासाठी घ्यायला आली तेव्हा एकुलत्या एक भावाच्या हरवण्यापासून त्यांच्या भेटीची कथा समोर आली आहे.

गुरुवारी धनंजयच्या पायातून होणार रक्तस्त्राव पाहून गीता गोपाळ संस्थेचे सदस्य साहिल याने त्याला मलमपट्टीसाठी जवळ बोलावले. यावेळी त्याने विचारले- तुम्ही कोठून आहात? मानसिक स्थिती ठीक नसल्यामुळे तो आपला पत्ता सांगू शकला नाही, परंतु थोड्या आठवणीनंतर त्याने एक मोबाईल नंबर सांगितला. नंबर आजमगडमध्ये जोडला गेला. शिशुपालने कॉल रिसीव्ह केला. त्यानंतर साहिलने धनंजयविषयी बोलले असता शिशुपाल काका असल्याचे समजले. त्याने तरूणचे नाव धनंजय उर्फ धर्मेंद्र असे सांगितले. धनंजय दोन वर्षांपूर्वी गायब झाला होता. शुक्रवारी धनंजयची बहीण नेहा त्याला नेण्यासाठी आली. भाऊ मंदिराच्या बाहेर बसला होता. दाढी आणि केस वाढले होते. धनंजयने बहिणीला पाहिल्याबरोबरच तिला ओळखले. बहिणीच्या तोंडून हेच निघाले, धमेंद्र, तुला भावाचा फोन नंबर आठवला, तर, दोन वर्षांपूर्वी मला कॉल आला नाही.

यासंदर्भातील वृत्त दैनिक भास्करने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार एकुलता एक भाऊ असल्याने धनंजय हा लाडका आणि हट्टी होता. त्याने पदवी प्राप्त केली आहे, तो व्यसनाधीन झाल्यामुळे त्याचे मानसिक संतुलन बिघडले आणि त्याने घर सोडले. कुटुंबाने त्याला शोधण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पण तो सापडला नाही. आतापर्यंत कुटूंबाच्या आशादेखील हरवल्या गेल्या. दोन दिवसांपूर्वीच काकूंनी असे सांगितले होते की तुझा भाऊ आता या जगात नाही. त्याच्यासाठी आम्ही गुरुवारचे उपवास देखील केले. योगायोग म्हणजे गुरुवारी देवानेच त्याची माहिती आम्हाला कळवली.

Leave a Comment