सलमानसोबत पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार ही अभिनेत्री


अलिकडेच आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा अभिनेता सलमान खानने केली आहे. तो ‘कभी ईद कभी दिवाली’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती फरहाद समजी आणि साजीद नादियाडवाला हे करत आहेत. सलमान खानसोबत या चित्रपटात अभिनेत्री क्रिती सेनॉन पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून सलमान खानने या चित्रपटाबद्दलची माहिती दिली होती. हा चित्रपट पुढच्या वर्षी ‘ईद’च्या मुहूर्तावर प्रदर्शित होईल. वेळोवेळी या चित्रपटाबद्दलचे अपडेट्स चाहत्यांशी शेअर केले जातील, असे या चित्रपटाशी संबधीत सुत्रांनी सांगितले आहे.


सलमान खान अलिकडेच ‘दबंग ३’ चित्रपटात दिसला. तो या चित्रपटानंतर ‘राधे’ चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट यावर्षी प्रदर्शित होईल. तर, क्रिती सेनॉनने ‘हाऊसफुल ४’ चित्रपटात भूमिका साकारली होती. तसेच, ‘पानिपत’ चित्रपटातही तिची महत्वपूर्ण भूमिका पाहायला मिळाली. आता ‘कभी ईद कभी दिवाली’ या चित्रपटाच्या निमित्ताने सलमान खान आणि क्रिती सेनॉन यांची जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Comment