काही दुर्मिळ, विचित्र आजार


आजकालच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये कोणत्याही गोष्टीबादल माहिती करून घेणे तितकेसे अवघड राहिले नाही. आपल्या माहितीमध्ये असणाऱ्या सर्वच गोष्टींबद्दल अधिक जाणून घ्यायचे असल्यास इंटरनेट च्या माध्यमातून आपल्याला हवी ती माहिती काही क्षणातच आपल्यापर्यंत पोहोचू शकते. पण जगामध्ये काही आजार असे आहेत, ज्यांच्याबद्दल लोकांना विशेष माहिती नसते, कारण हे आजार जितके विचित्र आहेत, तितकेच दुर्मिळ ही आहेत.

‘झेरोडर्मा पिग्मेंटोसम‘ हा आजार अतिशय दुर्मिळ असून या आजाराला ‘ व्हँपायर सिस्टम ‘असे ही म्हणतात. पण चित्रपटांमध्ये दाखविल्या जाणाऱ्या रक्तपिपासू ‘व्हँपायर‘ (सैतान)चा आणि या आजाराचा कोणताही संबंध नाही. हा आजार असणाऱ्या व्यक्तीची त्वचा सूर्यप्रकाश अजिबात सहन करू शकत नाही. हा आजार असणाऱ्या व्यक्तींना सतत घराच्या आत किवा जिथे सूर्यप्रकाश अजिबात पोहोचू शकत नाही, अशा ठिकाणी रहावे लागते. जरासाही सूर्यप्रकाश हा आजार असणाऱ्यांच्या अंगावर पडला तर त्यांच्या अंगावर भाजल्याप्रमाणे लाल चट्टे उठतात.

पॉलिमेलीया असा आजार आहे ज्यामध्ये तो आजार असणाऱ्या व्यक्तीला सामान्य व्यक्तींना असतात त्यापेक्षा हातापायांची बोटे अधिक असतात. म्हणजेच हाताच्या पाच बोटांच्या ऐवजी सहा बोटे असतात. काही रुग्णांना दोन हात- पायांच्या ऐवजी तीन किंवा चार हात अथवा पाय असू शकतात. रुग्णाच्या या स्थितीमुळे त्यांची शारीरिक हालचाल सहजगत्या होऊ शकत नाही. ओलीगोडॅक्टाईली हा आजार पोलीमेलीयाच्या बरोबर उलट असतो. ह्या आजारामध्ये रुग्णाला सामान्य व्यक्तींना असतात त्या पेक्षा कमी बोटे किंवा हात – पाय असतात.

फिश ओडर सिंड्रोम हा आजार आपल्या नावाप्रमाणेच शरिरातून माश्यांची दुर्गंधी निर्माण करणारा आहे. हा आजार अनुवांशिक असून, एका तऱ्हेने व्यक्तीच्या मेटाबोलिझमशी निगडीत आजार आहे. या आजारामध्ये रुग्णाच्या शरीरातून सडलेल्या माश्यांप्रमाणे दुर्गंधी येते. हा आजार शरीरामध्ये एन्झाइम्स च्या कमतरतेमुळे होत असून, हा आजार कधीही न बरा होणारा आहे.

नेव्हस ऑफ ओटा ह्या आजारामध्ये डोळ्यांमध्ये जास्त प्रमाणात पिग्मेंटेशन होऊन डोळ्यांमधील पांढऱ्या भागामध्ये काळसर डाग दिसून येतात. पण यामुळे दृष्टीवर कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाही. तसेच अक्रोमिया ह्या आजारामध्ये व्यक्तीच्या त्वचेला आणि केसांना रंग देणारे पिग्मेंट त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये अजिबातच नसल्याने त्या व्यक्तीचे केस, डोळे आणि त्वचा रंगहीन दिसतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment